Posts

Showing posts from June, 2025

अभय खोबरे यांची लायन्स क्लब अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांची लायन्स क्लब अक्कलकोटच्या २०२५-२६ या लायनेस्टिक वर्षासाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे.लायन्स क्लबच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत मावळते अध्यक्ष शिवानंद नंदर्गी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी क्लबचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकमताने नव्या कार्यकारिणीला पाठिंबा दिला. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष : अभय खोबरे सचिव : शिरीष पंडित खजिनदार : विठ्ठल तेली प्रथम उपाध्यक्ष : चेतन जाधव द्वितीय उपाध्यक्ष : कल्याणी आळगी तृतीय उपाध्यक्ष : राजू कारीमुंगी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतांना अभय खोबरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “लायनेस्टिक वर्षात सामाजिक उपक्रमांवर भर देत, गरजूंना मदत आणि जनतेची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील.” यावेळी माजी प्रांतपाल राजशेखर कापसे, झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

सागर सिमेंटच्या वितरकांचा गोवा दौरा: सोलापूर विमानतळावरून ऐतिहासिक प्रयाण!

Image
प्रतिनिधी- सोलापूर  महाराष्ट्रात कमी कालावधीत यश मिळवणाऱ्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांचा भव्य गोवा दौरा आजपासून सुरू झाला. या दौऱ्यासाठी वितरकांनी सोलापूर, हैद्राबाद व जळगाव विमानतळांवरून गोव्याच्या दिशेने विमानाने प्रस्थान केले. नव्याने सुरू झालेल्या सोलापूर-गोवा विमानसेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत, कंपनीच्या महाराष्ट्र हेड श्री. महादेव कोगनूरे यांच्या नेतृत्वाखाली वितरकांनी सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी प्रयाण केले. विमानतळाच्या मर्यादित आसन क्षमतेमुळे काही वितरकांना पर्यायी विमानतळांवरून प्रवास करावा लागला.याआधी दुबई व कझाकिस्तान दौऱ्याचे यशस्वी आयोजन केलेल्या सागर सिमेंट कंपनीने, गोवा परिषदेसाठीही विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोलापूर विमानतळावरून प्रवास करणारी सागर सिमेंट ही पहिली कंपनी ठरली आहे  आणि त्यामुळेच हा दौरा संपूर्ण उद्योग क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. दौऱ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कंपनी मॅनेजमेंट आणि मार्केटिंग हेड श्री. राजेश सिंग यांचे श्री. कोगनूरे यांनी विशेष आभार मानले आहेत.

सह्याद्री फाउंडेशन, पोलीस विभाग व IRB यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम

Image
प्रतिनिधी -सोलापूर तुळजापूर महामार्गालगत उळे येथे सह्याद्री फाउंडेशन, सोलापूर ग्रामीण पोलीस व IRB कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलिस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी उपस्थित होते. तसेच प्रमुख मान्यवरांमध्ये नेताजी (भाऊ) खंडागळे – अध्यक्ष, सह्याद्री फाउंडेशन व उपसरपंच, उळे  सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग,पीएसआय महेश घोडके, पीएसआय गंपुले,IRB प्रतिनिधी झजेरिया व कुलकर्णी, दत्ता डांगे,राम चौगुले,यांच्यासह परिसरातील पोलीस पाटील, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण व सामाजिक वनीकरणाची जनजागृती हा होता. सह्याद्री फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सर्व मान्यवरांनी उपक्रमासर्व मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांना सातत्याने राबविण्याचे आवाहन केले.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर व परिसरात दारूबंदीचे आदेश.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2025 च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर तसेच संत पालख्या मुक्कामाच्या विविध ठिकाणी सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दारूबंदीचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अंतर्गत या आदेशांची अंमलबजावणी केली जाणार आहे. पंढरपूर व परिसरातील दारूबंदीची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 4 जुलै ते 7 जुलै 2025 — पंढरपूर शहर व शहरापासून 5 कि.मी. परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी दुकाने संपूर्ण दिवस बंद राहतील.  दिनांक 9 व 10 जुलै 2025 — या दिवशी याच परिसरातील मद्यविक्री व ताडी दुकाने सायंकाळी 5.00 वाजेपासून बंद राहतील. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालख्या मुक्काम स्थळीही पूर्ण दारूबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार खालील गावांमध्ये दारूबंदी असेल: 30 जून 2025 (सोमवार) – नातेपुते 1 जुलै 2025 (मंगळवार) – माळशिरस, अकलुज 2 जुलै 2025 (बुधवार) – वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर 3 जुलै 2025 (गुरुवार) – भंडीशेगाव, पिराची कुरोली 4 जुलै 2025 (शुक्रवार) – वाखरी या काला...

ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश स्कूलचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Image
प्रतिनिधी -सोलापूर ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचा १५ वा वर्धापन दिन दि. २३ जून रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजमोहन फोफलिया सर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सचिन चव्हाण सर विराजमान होते. संस्थेच्या सचिवा ज्योती चव्हाण मॅडम यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापिका उर्मिला कटप मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आसिया शेख मॅडम व सविता सावंत मॅडम यांनी केले.कार्यक्रमात शाळेच्या दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. दहावीचा शंभर टक्के निकाल या शाळेची सातत्याने जपली गेलेली परंपरा आहे. विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, ई-लर्निंग सुविधांनी युक्त वर...

सन्मति ज्ञान प्रसारक मंडळ संचलित,लाल बहादूर शास्त्री हायस्कूल,सोलापूर मध्ये स्कूल बॅग वाटप कार्यक्रम संपन्न.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सन्मति ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल,सोलापूर मध्ये स्कूल बॅग वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हूणन शमनोज देवकर(अध्यक्ष इकोनेचर क्लब, सोलापूर ) तर प्रमुख पाहुणे म्हणून उमा देगीनाळ (समाजसेविका )व श्रीपती देगीनाळ (चिफ ऑफिसर सुपरीटेंडन्ट रेल्वे विभाग ) आणि प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता हाडोळे व सारा न्यूज चॅनेल चे राम हुंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन संपन्न झाले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.प्रशालेतील सहशिक्षक महेश गिरम यांनी उपस्थित प्रमुख पाहुणच्यांचे परिचय करून दिले.तसेच प्रशालेतील सहशिक्षक अमोल तावसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उमा देगीनाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.यानंतर श्रीपती देगीनाळ यांनी आपल्या मनोगतात वृक्षाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.अध्यक...

भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची वाटचाल; अहिल्यानगर भाजपचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी वटवृक्ष मंदिरातील सन्मानाअंती व्यक्त केले मनोगत.

Image
  आमदार संग्राम भैया जगताप  यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व आमदार गोपीचंद पडळकर, मिलनदादा कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट,  माया, ममता, करुणा, दयासागरेचा अखंड झरा अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त स्वरूपात आहे. यानिमित्त स्वामी भक्तांची संख्या वाढत आहे वाढत असलेल्या स्वामी भक्तांच्या सेवेत देवस्थान सदैव तत्पर आहे. मंदिर समिती स्वामी समर्थांच्या दर्शनार्थ भाविकांसाठी अनेक सोई सुविधा निर्माण करीत आहे, म्हणून भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदीर समितीची उत्कृष्ट वाटचाल चालू असल्याचे मनोगत अहिल्या नगरचे भाजपचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील  श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी आमदार संग्राम भैया जगताप यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला.  याप्रस...

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड.

Image
प्रतिनिधी-सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाकडून सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी नियुक्तीचे पत्र स्वीकारले. या निवडीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची जबाबदारी उमेश पाटील यांच्यावर येणार आहे. यापूर्वी दीपक साळुंखे शिवसेनेत गेल्याने जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदासाठी अनेक इच्छुकांनी रस दाखवला होता. मात्र कट्टर अजित पवार समर्थक असलेले पाटील यांची निवड पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला अधोरेखित करणारी ठरली. विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील यांनी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचं शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवार यांना दिलेल्या शब्दाला जागून त्यांनी मोहोळ मतदारसंघात यशवंत माने यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांच्या या निष्ठेचा गौरव करत अजित पवार यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पाटील यांची नियुक्ती झाल्याने...

पद्मश्री, अरण्यऋषी- मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 वर्षी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला.

Image
शब्दांकन- प्रसाद अतनूरकर. सोलापूर. अरण्यऋषी, ज्येष्ठ साहित्यिक,आणि सोलापूरची शान असे असलेले मारुती चित्तमपल्ली यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना नुकतीच "पद्मश्री" ही पदवी प्रदान करण्यात आली होती. पक्षी, प्राणी यांच्याबद्दलच्या मनस्वी प्रेमापोटी त्यांची खूप बारीक बारीक तपशीलात मांडणी त्यांनी केलेली पुस्तके हीच आता त्यांनी आपल्याला दिलेली भेट राहिलेली आहे. आपल्याला मिळालेल्या नोकरीचा आपल्या आवडीत रूपांतर करून त्याचा ध्यास घेऊन अभ्यासाने प्रकट होत असलेले श्री चित्तमपल्ली वयाने 93 व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने ते सामान्य जनतेला भेटत आणि चर्चाही करत. अशा थोर व्यक्ती आता हळूहळू कमी होत आहेत. आणि अशा अभ्यासू व्यक्ती नसल्याने इथून पुढची पिढी फक्त " गुगल" कडूनच ज्ञान मिळवू शकेल. पण ते तपासण्यासाठीची कोणतीही संधी मिळणार नाही, तर कुणीतरी त्याच्यावर टाकलेली माहिती हीच आपल्याला मिळेल. त्याच्याविषयी तपशीलवार अधिक आपली माहिती आता मिळणे कठीण होणार आहे, हे नक्की. ही पोकळी भरून काढणे शब्दशः अवघड आहे. भावपूर्ण श्रद्धांजली या दोन शब्दात पूर्ण भावना व्यक्त करण्य...

टीव्ही 9 मराठीचे सोलापूर प्रतिनिधी व लोकप्रिय पत्रकार सागरजी सुरवसे यांचा 38 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Image
प्रतिनिधी - सोलापूर   टीव्ही 9 मराठीचे सोलापूर प्रतिनिधी व लोकप्रिय पत्रकार सागरजी सुरवसे यांचा 38 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद बागेत विविध संघटना व पत्रकार मित्रांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा भव्य सोहळा पार पडला. यावेळी सागर सुरवसे यांचा सत्कार तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष महेशभाऊ डोलारे, दैनिक शिव-निर्णयचे संपादक अनिल शिराळकर, भाजप युवा कामगार मोर्चा नितीन करजोळे, सारां न्यूजचे संपादक रामा हुंडारे, कायद्याचा दणका संपादक नितीन कांबळे, हिस्टोरी संपादक रामा गायकवाड, अंतिम न्याय पत्रकार अकबर भाई शेख, जय हो संपादक विजयकुमार उघडे, सोलापूर राज संघर्षचे संपादक लतीफभाई नदाफ, सोलापूर क्रांतीचे संपादक मिलिंद नाना प्रक्षाळे, सोलापूर नगरी न्यूज संपादक गिरमल गुरव, सोलापूर मेट्रो साप्ताहिक व चॅनलचे संपादक विकास कस्तुरे, सोलापूर 24 न्यूज संपादक गणेश भालेराव, सोलापूर साक्षीदारचे संपादक असलम नदाफ, तसेच साजिद मकानदार, सुरज रजपूत, नरेन कांबळे, सादिक सौदागर व काँग्रेस विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष चै...

नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये 'विद्यारंभ दिन' उत्साहात संपन्न

Image
प्रतिनिधी -सोलापूर  नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ‘विद्यारंभ दिन’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार करजगी, सचिवा वर्षा विभूते, विश्वस्त नंदिनी करजगी, मोहिनी करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे, कॉलेजच्या प्राचार्या स्मिता कुलकर्णी तसेच धनेश कडते, गणेश पोतदार, कुंभार, चंद्रकांत निंगफोडे, महादेव मंगरुळे व महादेव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले आणि कै. नागेश करजगी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेबद्दलची माहिती पुष्पा ढवळे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षिका प्रज्ञा वट्टे व दिपाली नरगिडे यांनी केले. कार्यक्रमाने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची ऊर्जा व प्रेरणा निर्माण केली.

भाविकांच्या सेवेत श्री.वटवृक्ष मंदीर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय - संपादक उदय तानपाठक.

Image
संपादक उदय तानपाठक  यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांसाठी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी सुसज्ज वातानुकूलित भक्तनिवासाचे बांधकाम तसेच स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी दर्शनाकरिता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आले आहेत. या सर्व बाबी स्वामी भक्तांसाठी सेवाभाव या हेतूने मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असते. त्या अनुषंगाने नियोजीत मुरलीधर मंदिर येथील दर्शन रांगेच्या माध्यमातून सर्व स्वामीभक्तांना लवकरच स्वामी समर्थांचे सुलभरीत्या दर्शन घेता येईल. यासह देवस्थानचे आध्यात्मिक धार्मिक सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेता नागरिकांच्या व भाविकांच्या सेवेसाठी श्री वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याचे मनोगत श्री.अंबिका वृत्तपत्र प्रकाशन समुहाचे मुख्य राजकीय संपादक उदय तानपाठक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील  श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर...

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट  दिनांक १६ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवागतांचा प्रवेशोत्सव, पुस्तक वाटप, वह्या वाटप, स्कूल बॅग वाटप,शूज आणि सॉक्स वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रथमतः आज सकाळी गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळाले. 'शाळेला चला शाळेला चला ' या घोषवाक्याने सर्व परिसर दुमदुमला होता. मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार सर यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या वह्यांचे वाटप इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आजदिनी करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल कागदावर घेऊन आज ते पालकांना देण्यात आले. गुलाबपुष्प, चॉकलेट, पुस्तक वाटप, स्कूल बॅग, शूज आणि सॉक्स यांचे वाटप तसेच पाठ्यपुस्तक देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवणाचे नियोजन आजदिनी करण्यात आले.        सदर कार्यक्रम प्रसं...

जिल्हा परिषदेच्या तुंगत शाळेला पालकमंत्र्यांनी भेट.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  आधुनिक शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शाळांना मॉडेल बनवण्याचे काम केंद्र व राज्य शासन करीत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, उपक्रम राबवित आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासन शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. आज दिनांक 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे.शाळा प्रवेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील शाळेला भेट दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सरपंच डॉ अमृता रणदिवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन वनसाळे, यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थि...

गुणवंत विद्यार्थ्यांचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

Image
प्रतिनिधी -सोलापूर, शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभाग आणि मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे कर्मचारी व बीट पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुलदीप जंगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, गायक मोहंमद अय्याज, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे व स्वाती हवेले, तसेच कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव दिनेश बनसोडे, सचिन चव्हाण, विशाल घोगरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मोहंमद अय्याज यांच्या सुमधुर "महाराष्ट्र गीत" सादरीकरणाने झाली. त्यानंतर सचिन जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “आई-वडील आणि गुरुजनांनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास यश ...

सह्याद्री फाऊंडेशन- नेताजी (भाऊ) खंडागळे जनसंपर्क कार्यालय

Image
  🌸 सस्नेह निमंत्रण 🌸 सह्याद्री फाऊंडेशन नेताजी (भाऊ) खंडागळे जनसंपर्क कार्यालय आपल्या प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छांनी प्रेरित होऊन भव्य उद्‌घाटन सोहळा शनिवार, १४ जून २०२५, रोजी दुपारी १२.३० वा. संपन्न होत आहे. या शुभारंभप्रसंगी आपली उपस्थिती आम्हाला अत्यंत प्रेरणादायी ठरेल. आपण उपस्थित राहून आमचा आनंद व्दिगुणित करावा, ही नम्र विनंती.   शुभहस्ते मा.आ.श्री. सचिन(दादा)कल्याणशेट्टी आमदार, अक्कलकोट विधानसभा - 6 कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शहाजी (भाऊ) पवार भाजपा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य   प्रमुख उपस्थिती मा. श्री. शशिकांत (नाना) चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष, सोलापूर आपले विनीत, नेताजी (भाऊ) गंगाधर खंडागळे उपसरपंच, उळे अध्यक्ष, सह्याद्री फाऊंडेशन कार्यकमाचे  स्थळ:- गाळा नं. ०४, रविवार पेठ, पवनकुमार हॉटेल समोर, मार्केट यार्ड, सोलापूर - ४१३००५ 🌼 बोरामणी, उळे-कासेगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांना आग्रहाचे निमंत्रण 🌼

वटवृक्ष मंदिरातील सत्कार जीवनातील मोठा गौरव - भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये

Image
केशव उपाध्ये व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट  स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामी भक्त आहे. याच स्वामी भक्तीच्या माध्यमातून अक्कलकोटला आल्यानंतर समर्थांनी स्वामी दर्शनाची संधी वेळोवेळी  देत रहावी. या माध्यमातून स्वामी कृपेचे वरदहस्त माझ्या व माझ्या कुटुंबीयांवर कायम रहावी याकरिता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. या प्रित्यर्थ माझ्या जीवनावर स्वामीकृपा झाली. स्वामी कृपेने माझ्या जीवनातील पत्रकार ते प्रवक्ता ही वाटचाल आणि दर्शनानंतर लाभलेलं येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील विश्वस्त समितीच्या वतीने झालेला सत्कार म्हणजे जीवनातील मोठा गौरव असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रस...

स्वामी समर्थांवरील श्रद्धेमुळे आज खास स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला आले.-ना.पंकजा मुंडे

Image
ना.पंकजा मुंडे यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिनदादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत. प्र तिनिधी-अक्कलकोट              येथील श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे अक्कलकोटचा भौगोलिक विस्तार होत आहे. ती सर्व स्वामी समर्थांची किमया आहे. श्री स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे येथे अनेक भाविकांची आवक वाढत चालली आहे. अनेक भाविकांची  श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा अढळ आहे. श्री स्वामी समर्थांचे येथे जागृत वास्तव्य असल्याने स्वामींचे मुळस्थान असलेले  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भूतलावरील आध्यात्मिक नंदनवन असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण-हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री (कॅबिनेट मंत्री) तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. तत्पुर्वी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी ना.पंकजा मुंडे यांचे पुष...

वटवृक्ष छायेखाली स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सिद्धाराम म्हेत्रे व अन्य  प्रतिनिधी-अक्कलकोट              येथील श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाच्या छायेने साक्षात स्वामी समर्थांचे वावर अनुभवले आहे. त्यामुळे स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवतात. विश्वशांतीचे प्रतिक असलेले येथील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जगाला सन्मार्ग दाखविणारे गुरूमाऊली आहेत. माझ्यासह त्यांचा आशिर्वाद महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाभत रहाव्यात अशी प्रार्थना स्वामी चरणी आहे. आज या प्रसंगी मलाही समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी समर्थांच्या ब्रीद वाक्याची प्रचिती येऊन येथील वटवृक्षाच्या छायेत स्वामी माऊलींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअ...

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनच्या वतीने १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन - महेश इंगळे

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट  श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दिनांक ६ जून रोजी सकाळी ११ वाजता दहावी व बारावी मधील गुणवत्तापूर्ण उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे  यांनी दिली. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी अक्कलकोट तालुक्यात गेल्या १५ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्यामध्ये अग्रेसर असलेल्या व तालुक्यातील एकमेव तथा एन.बी.ए. मानांकन प्राप्त असलेल्या कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे.  १० वी, व १२ वी मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशिष्ट सत्कार सोहळा याप्रसंगी संपन्न होणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत / अभ्यासात (शिक्षणात) आवड निर्माण व्हावी, यासाठी म...

सागर सिमेंट व एम के फाउंडेशन कडून शिक्षक- विद्यार्थी व पालकांना आवाहन.

Image
प्रतिनिधी-सोलापूर मागील अनेक वर्षांपासून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात मदत व्हावी म्हणून दरवर्षी लाखो वह्या सागर सिमेंट व एम के फाउंडेशन कडून वाटप करण्यात येत आहेत, दरवर्षी प्रमाणे यंदाही सागर सिमेंट व एम के फाउंडेशन च्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ करीता  एक लाख वह्या वाटप करण्याचे उद्दीष्ट ठेऊन उपक्रमास सुरुवात करणार आहोत, यासाठी आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळा, शिक्षक,गरीब,गरजू विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या यंदा ही सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहेत, या उपक्रमाचा अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होत आहे. तरी आपल्या भगातील संबंधित जिल्हा परिषद शाळा शिक्षक व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकरिता लागणाऱ्या वह्यांची मागणी संबंधित शाळेच्या लेटरहेडवर मागणी करावी ,तसेच संबंधित मागणी पत्र सागर सिमेंट कार्यालय सोलापूर येथे जमा करावे,   आता १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. यासाठी बहुसंख्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना महागाईच्या काळात वह्या खरेदी करणे परवडत नाही...