जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

प्रतिनिधी-अक्कलकोट
 दिनांक १६ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवागतांचा प्रवेशोत्सव, पुस्तक वाटप, वह्या वाटप, स्कूल बॅग वाटप,शूज आणि सॉक्स वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रथमतः आज सकाळी गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळाले. 'शाळेला चला शाळेला चला ' या घोषवाक्याने सर्व परिसर दुमदुमला होता.
मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार सर यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या वह्यांचे वाटप इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आजदिनी करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल कागदावर घेऊन आज ते पालकांना देण्यात आले.गुलाबपुष्प, चॉकलेट, पुस्तक वाटप, स्कूल बॅग, शूज आणि सॉक्स यांचे वाटप तसेच पाठ्यपुस्तक देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवणाचे नियोजन आजदिनी करण्यात आले.
       सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत बिराजदार, उपाध्यक्षा सौ. रुपाली म्हेत्रे, सदस्य श्री. बसलिंगप्पा भासगी, तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. दिनकर भारती यांनी केले.
        कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार, श्री. हणमंतराव गुंडरगी, श्री. दिनकर भारती, सौ. हाजराबी बागवान, सौ. संध्या बशेट्टी, सौ. सोनाली भारती, कु. मयुरी फुलारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर