स्वामी समर्थांवरील श्रद्धेमुळे आज खास स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला आले.-ना.पंकजा मुंडे

ना.पंकजा मुंडे यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिनदादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.
प्रतिनिधी-अक्कलकोट
             येथील श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे अक्कलकोटचा भौगोलिक विस्तार होत आहे. ती सर्व स्वामी समर्थांची किमया आहे. श्री स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे येथे अनेक भाविकांची आवक वाढत चालली आहे. अनेक भाविकांची श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा अढळ आहे. श्री स्वामी समर्थांचे येथे जागृत वास्तव्य असल्याने स्वामींचे मुळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भूतलावरील आध्यात्मिक नंदनवन असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण-हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री (कॅबिनेट मंत्री) तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. तत्पुर्वी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी ना.पंकजा मुंडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. मुंडे यांच्या श्री स्वामी दर्शनानंतर मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन व प्रमुख महेश इंगळे - प्रथमेश इंगळे यांनी ना.पंकजा मुंडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना ना.पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे मुंडे कुटुंबियांचे श्रद्धास्थान आहे. मी व माझे कुटुंबीय श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. ज्या ज्या वेळी या भागात यायची संधी मिळते त्यावेळी नक्कीच स्वामी दर्शनाचा लाभ घेते, परंतु आज खास स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येथे येऊन समर्थांचे दर्शन घेतले व येथे बसून शांतचित्ताने स्वामी समर्थांचे नामस्मरण, नामजप केले आहे हा आनंद जीवनाला एक अतिमहत्त्वाचं समाधान देणारा ठरणार आहे. माझ्यासारखे अनेक स्वामी भक्त येथे दररोज येतात. त्यांच्या सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचे काम मंदिर समितीच्या वतीने समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत कुशलतेने हाताळत आहेत, हे कार्य पाहूनही अत्यंत समाधान वाटले. भाविकांना येथे विविध धार्मिक कार्यक्रम करण्याकरिता वारंवार नेहमीच संधी देवून विविध आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात, ज्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रचार प्रसार होण्यासही मंदिर समितीचा व समितीचे प्रमुख महेश इंगळे व कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. या औचित्यानेही 
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भूतलावरील आध्यात्मिक नंदनवन असल्याचे पुनरुच्चार ना.पंकजा मुंडे यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पर्यावरण संवर्धन संदर्भात ही उपस्थितांना मार्गदर्शन पर उपदेश केले. याप्रसंगी तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, मा.नगरसेवक महेश हिंडोळे, नागराज कुंभार, मल्लीनाथ स्वामी, शिवशंकर चनशेट्टी, नन्नू कोरबू, अंकूश चव्हाण, कांतू धनशेट्टी, लखन झंपले, धर्मण्णा पाटील, अप्पी साळूंखे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, समर्थ स्वामी, तुषार मोरे आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.