राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड.

प्रतिनिधी-सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाकडून सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी नियुक्तीचे पत्र स्वीकारले.या निवडीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची जबाबदारी उमेश पाटील यांच्यावर येणार आहे. यापूर्वी दीपक साळुंखे शिवसेनेत गेल्याने जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदासाठी अनेक इच्छुकांनी रस दाखवला होता. मात्र कट्टर अजित पवार समर्थक असलेले पाटील यांची निवड पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला अधोरेखित करणारी ठरली.विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील यांनी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचं शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवार यांना दिलेल्या शब्दाला जागून त्यांनी मोहोळ मतदारसंघात यशवंत माने यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील राहिले.त्यांच्या या निष्ठेचा गौरव करत अजित पवार यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पाटील यांची नियुक्ती झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर