सागर सिमेंटच्या वितरकांचा गोवा दौरा: सोलापूर विमानतळावरून ऐतिहासिक प्रयाण!
महाराष्ट्रात कमी कालावधीत यश मिळवणाऱ्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांचा भव्य गोवा दौरा आजपासून सुरू झाला. या दौऱ्यासाठी वितरकांनी सोलापूर, हैद्राबाद व जळगाव विमानतळांवरून गोव्याच्या दिशेने विमानाने प्रस्थान केले.
नव्याने सुरू झालेल्या सोलापूर-गोवा विमानसेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत, कंपनीच्या महाराष्ट्र हेड श्री. महादेव कोगनूरे यांच्या नेतृत्वाखाली वितरकांनी सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी प्रयाण केले. विमानतळाच्या मर्यादित आसन क्षमतेमुळे काही वितरकांना पर्यायी विमानतळांवरून प्रवास करावा लागला.याआधी दुबई व कझाकिस्तान दौऱ्याचे यशस्वी आयोजन केलेल्या सागर सिमेंट कंपनीने, गोवा परिषदेसाठीही विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोलापूर विमानतळावरून प्रवास करणारी सागर सिमेंट ही पहिली कंपनी ठरली आहे आणि त्यामुळेच हा दौरा संपूर्ण उद्योग क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
दौऱ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कंपनी मॅनेजमेंट आणि मार्केटिंग हेड श्री. राजेश सिंग यांचे श्री. कोगनूरे यांनी विशेष आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240