भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची वाटचाल; अहिल्यानगर भाजपचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी वटवृक्ष मंदिरातील सन्मानाअंती व्यक्त केले मनोगत.
![]() |
आमदार संग्राम भैया जगताप यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व आमदार गोपीचंद पडळकर, मिलनदादा कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन व अन्य दिसत आहेत. |
माया, ममता, करुणा, दयासागरेचा अखंड झरा अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त स्वरूपात आहे. यानिमित्त स्वामी भक्तांची संख्या वाढत आहे वाढत असलेल्या स्वामी भक्तांच्या सेवेत देवस्थान सदैव तत्पर आहे. मंदिर समिती स्वामी समर्थांच्या दर्शनार्थ भाविकांसाठी अनेक सोई सुविधा निर्माण करीत आहे, म्हणून भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदीर समितीची उत्कृष्ट वाटचाल चालू असल्याचे मनोगत अहिल्या नगरचे भाजपचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी आमदार संग्राम भैया जगताप यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप बोलत होते. पुढे बोलताना आमदार संग्राम भैया जगताप यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे तथा राज्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष मंदिरात होत असलेले विविध कामकाज हे भाविकांच्या सोई सुविधांना प्राधान्य देत मंदिर समिती कार्य करीत आहे म्हणून भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची सुरू असलेली वाटचाल पाहून समाधान वाटले असेही मनोदय व्यक्त करून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, मिलनदादा कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ व अन्य सेवेकरी तथा भक्तगण उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240