नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये 'विद्यारंभ दिन' उत्साहात संपन्न
प्रतिनिधी -सोलापूर
नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ‘विद्यारंभ दिन’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार करजगी, सचिवा वर्षा विभूते, विश्वस्त नंदिनी करजगी, मोहिनी करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे, कॉलेजच्या प्राचार्या स्मिता कुलकर्णी तसेच धनेश कडते, गणेश पोतदार, कुंभार, चंद्रकांत निंगफोडे, महादेव मंगरुळे व महादेव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले आणि कै. नागेश करजगी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शाळेबद्दलची माहिती पुष्पा ढवळे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षिका प्रज्ञा वट्टे व दिपाली नरगिडे यांनी केले. कार्यक्रमाने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची ऊर्जा व प्रेरणा निर्माण केली.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240