आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर व परिसरात दारूबंदीचे आदेश.
प्रतिनिधी -सोलापूर
आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2025 च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर तसेच संत पालख्या मुक्कामाच्या विविध ठिकाणी सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दारूबंदीचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अंतर्गत या आदेशांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पंढरपूर व परिसरातील दारूबंदीची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 4 जुलै ते 7 जुलै 2025 — पंढरपूर शहर व शहरापासून 5 कि.मी. परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी दुकाने संपूर्ण दिवस बंद राहतील.
दिनांक 9 व 10 जुलै 2025 — या दिवशी याच परिसरातील मद्यविक्री व ताडी दुकाने सायंकाळी 5.00 वाजेपासून बंद राहतील.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालख्या मुक्काम स्थळीही पूर्ण दारूबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार खालील गावांमध्ये दारूबंदी असेल:
30 जून 2025 (सोमवार) – नातेपुते
1 जुलै 2025 (मंगळवार) – माळशिरस, अकलुज
2 जुलै 2025 (बुधवार) – वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर
3 जुलै 2025 (गुरुवार) – भंडीशेगाव, पिराची कुरोली
4 जुलै 2025 (शुक्रवार) – वाखरी
या कालावधीत सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240