अभय खोबरे यांची लायन्स क्लब अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

प्रतिनिधी -अक्कलकोट,
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांची लायन्स क्लब अक्कलकोटच्या २०२५-२६ या लायनेस्टिक वर्षासाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे.लायन्स क्लबच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत मावळते अध्यक्ष शिवानंद नंदर्गी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी क्लबचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकमताने नव्या कार्यकारिणीला पाठिंबा दिला.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष : अभय खोबरे
सचिव : शिरीष पंडित
खजिनदार : विठ्ठल तेली
प्रथम उपाध्यक्ष : चेतन जाधव
द्वितीय उपाध्यक्ष : कल्याणी आळगी
तृतीय उपाध्यक्ष : राजू कारीमुंगी
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतांना अभय खोबरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “लायनेस्टिक वर्षात सामाजिक उपक्रमांवर भर देत, गरजूंना मदत आणि जनतेची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
यावेळी माजी प्रांतपाल राजशेखर कापसे, झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर