ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश स्कूलचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी -सोलापूर
ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचा १५ वा वर्धापन दिन दि. २३ जून रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजमोहन फोफलिया सर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सचिन चव्हाण सर विराजमान होते. संस्थेच्या सचिवा ज्योती चव्हाण मॅडम यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापिका उर्मिला कटप मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आसिया शेख मॅडम व सविता सावंत मॅडम यांनी केले.कार्यक्रमात शाळेच्या दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. दहावीचा शंभर टक्के निकाल या शाळेची सातत्याने जपली गेलेली परंपरा आहे. विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, ई-लर्निंग सुविधांनी युक्त वर्ग, तसेच क्रीडांगण अशा आधुनिक शिक्षणात्मक सुविधा उपलब्ध आहेत. शाळेचा सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण या उद्दिष्टांसह संस्थेचा पुढील वाटचालीनं उत्साही वातावरण निर्माण केले आहे.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.