Posts

Showing posts from February, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडे वस्ती- क्षेत्रभेटी अंतर्गत शैक्षणिक सहल.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडे वस्ती- क्षेत्रभेटी अंतर्गत शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने सोलापूर येथे- पार्ले जी बिस्कीट कंपनी ला प्रथम भेट देण्यात आली. त्यानंतर सोलापूरचे आराध्यैवत श्रीयोगी सिद्धरामेश्वर मंदिर या ठिकाणी भेट देण्यात आली.  मंदिराच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी मंत्री ,विद्यमान उत्तर सोलापूरचे आमदार श्री.विजयकुमार देशमुख साहेबांची  भेट झाली आणि मुलाबरोबर त्यांनी फोटो काढला आणि मुलांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध असा आदिलशाच्या काळात बांधलेला भुईकोट किल्ला मुलांना दाखवण्यात आला .किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती देण्यात आली. मुलांनी किल्ल्यातील गार्डनमध्ये भरपूर आनंद घेतला आणि अनेक प्रकारचे खेळण्या होत्या त्यामुळे त्या खेळण्याचा आनंद मुलाने लुटला  त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद अत्यंत ओसंडून वाहत होता. भुईकोट किल्ल्यातील उपयुक्त माहिती मुलांना देण्यात आली आणि मुलाने प्रत्यक्ष किल्ले बघितले . -------------------------------------- ▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️...

दिल्ली कार्यशाळेसाठी सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची निवड ;अक्कलकोट तालुक्यातील एकमेव सरपंच.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट  आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुषंगाने पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने चार व पाच मार्च रोजी होणाऱ्या शासकीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातील चपळगावचे सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ४० तर सोलापूर जिल्ह्यातून ७ महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.यामध्ये संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून  चपळगावच्या सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी ज्या ज्या सरपंचांची धडपड आहे अशा महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळके यांच्याकडून सांगण्यात आले.सदर निवडीबद्दल देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,माजी सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील, संस्थाध्यक्ष रविकांत पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील,बसवराज बाणेगांव, उपसरपंच सुवर्णा कोळ...

बसवराज पाटील यांच्या हस्ते बसवराज पेट्रोलियमचे उद्घाटन.....

Image
मुरूम, ता. २५ (प्रतिनिधी)   देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी तरुणांनी नवनवीन व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या प्रगती बरोबरच देशाची ही प्रगती होते. सध्या पेट्रोल, डिझेल हे अत्यावश्यक झाल्याचे प्रतिपादन  उद्घाटन प्रसंगी  माजी राज्यमंत्री  बसवराज पाटील यांनी केले. मुरूम ता. उमरगा येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे बसवराज पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन बसवराज पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) रोजी करण्यात आले. यावेळी  जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सोलापूरचे सीनियर सेल्स मॅनेजर शाश्वत शर्मा, संस्कार गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पत्रिके, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सचिन राजनाळे, विश्वनाथ मुदकण्णा, अंकुश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, मुरूम हे शहर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. त्यामुळे येथे दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायामुळे इथल्या ग्राहकांची सेवाच होणार आह...

महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल- रात्री त्र १० ते १२ या वेळेत महापूजा व आरती.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट  सालाबादाप्रमाणे यंदाही येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील दिनचर्येत व स्वामींच्या नित्योपचारात पारंपारीक पध्दतीचे बदल करण्यात आले आहेत अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. सालाबाद प्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती महाशिवरात्रीमुळे होणार नाही. महाशिवरात्री रोजी रात्री १० ते १२ या वेळेत पुरोहीत मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या विधीवत मंत्रोच्चारात रुद्राभिषेक व महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री बारा वाजता श्रींची आरती होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहीतीही महेश इंगळे यांनी याप्रसंगी दिली तसेच यावेळी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाविकांना केले आहे. -------------------------------------- ▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

संत निरंकारी मंडळाकडून मुरूमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसराची स्वच्छता.

Image
मुरूम, ता. उमरगा येथील संत निरंकारी मंडळाकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा परिसर स्वच्छ करताना पुरुष व माता भगिनी.  मुरुम, ता. उमरगा, ता. २३ (प्रतिनिधी)  संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली व मुरुम शाखेकडून संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात हा दिवस स्वच्छता मोहीम म्हणून साजरा केला जातो. सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवारी (ता.२३) रोजी स्वच्छ चल स्वच्छ मन मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम रोटरी क्लबच्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, बालाजी व्हनाजे, मुख्याध्यापिका अलका गायकवाड,  नळदुर्गचे राजेंद्र पोतदार, प्रा. डॉ. महेश मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कल्लेश्वर पांचाळ, रमेश मिणीयार, तुकाराम शेवाळे, सुरेश कोळी, सुधाकर नारायणकर, हनुमंत पोतदार, प्...

गौतम गायकवाड यांना रोटरीचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी व उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२५ चा आदर्श पत्रकार पुरस्कार दै. तरुण भारत संवादचे गौतम गायकवाड जाहीर करण्यात आला आहे. आयोजकांच्या वतीने सहा पत्रकारांचा गौरव यानिमित्ताने करण्यात येत आहे. पत्रकार डॉ. रमेश पवार, डॉ. दिग्विजय जिरगे, प्रकाश सनपूरकर, रविंद्र दंतकाळे, केवल तिवारी यांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे. जेष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे यांना यानिमित्ताने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ बा. टेक्सटाईल डेव्हलपमेंट फौडेशन सभागृह, अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळ सोलापूर येथे होत आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार शरदकुमार एकबोटे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अंबादास गड्डुम, सचिव नरसिंह कणकी, यल्लादास लछमापूर, कालिदास माणेकरी यांनी आवाहन केले आहे. -------------------------------------- ▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर...

मुरुम येथे विविध ठिकाणी शिवजन्मोत्सवाचा जागर मोठ्या प्रमाणात.

Image
प्रतिनिधी-मुरुम  शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सुत्र विश्वाचे की असा अभंग राष्ट्रसंत तुकोबारायांनी शिवरायांप्रति व्यक्त केला आहे,  त्यामुळे आजही या युगपुरुषाचे नाव ऐकल्यावर घराघरातल्या आईला वाटते असा पोर माझ्या पोटी जन्माला यावा असे जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम पुत्र असणाऱ्या कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१९) रोजी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहादत मोहल्ला, किसान चौक व विविध शाळा महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने किसान चौक येथील शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रामहरी अंबर शिवप्रेमी प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती चे अध्यक्ष विशाल मोहिते मध्यवर्ती शिवजयंती समितीचे अध्यक्ष अल्फान दिवटे व मुरूम शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी गव्हाणे यांच्या हस्ते मूर्ती पुष्पहार घालून त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करीत शहरातील वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी किरण गायकवाड अजित चौधरी आनंद कांबळे श्रीकांत...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने जिल्हा परिषद परिसर दुमदूमला;जिल्हाधिकारी व सिईओ यांनी केले पालखी चे सारथ्य..!

Image
प्रतिनीधी - सोलापूर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने  परिसर दुमदूमला…छत्रपती शिवाजी महाराज कि जय…जय भवानी व जय शिवाजी चेया गजरानं आज जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी उद्यान दुमदुमून गेले होते.  आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हा परिषदेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी उद्यान शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे प्रशासकता मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  मीनाक्षी  वाकडे, अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा जल व्यवस्थापन अधिकारी पारसे, मराठा सेवा संघाचे शाखाध्यक्ष  अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अरूण क्षिरसागर, अधिक्षक  अनिल जगताप, चंद्रकांत...

आंतरजिल्हा गुन्हेगाराकडून, घरफोडीचे ०२ गुन्हे उघडकीस, एकूण १४,३९,०००/-रूपयेचा मुद्देमाल जप्त ; शहर गुन्हे शाखेची कामगिरी.

Image
सोलापूर / प्रतिनिधी  दि.१५/०२/२०२५ रोजी, तक्रारदार नामे सुरेखा विठ्ठल तोडकरी, वय ५२ वर्षे, व्यवसाय नोकरी, शिक्षीका, रा. विरभद्र निवास, घर नं.७, चाटला चौक, जोडभावी पेठ सोलापूर यांचे तिसऱ्या मजल्यावरील राहते घराचे कोणीतरी अज्ञात इसमाने, दिवसा कुलूप तोडून, घरात प्रवेश करुन, बेडरुममधील फर्निचरचे कपाट तोडून, कपाटातील सुमारे १७७.७ ग्रॅम (१७.७ तोळे) वजनाचे दागिने, व रोख रक्कम रु, २३,०००/- चोरुन नेले. सदर घटनेबाबत जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. १०२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब) त्याचप्रमाणे, दि. १२/०२/२०२४ रोजी तक्रारदार महिला नामे फराह रशीद शेख वय-५१ वर्षे, व्यवसायः-शिक्षीका, रा. शाब्दी अपार्टमेंट तिसरा मजला प्लॉट नं. १५, तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर यांचे बंद घराचे कुलूप, दिवसा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडून, घरात प्रवेश करुन, बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून, कपाटातील सुमारे ३५.५ ग्रॅम (३.५ तोळे) वजनाचे दागिने, व रोख रक्कम रु, १,००,०००/- चोरुन नेले. सदर घटनेबाबत जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शह...

सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु वाय.एच.यांच्या फेर नियुक्तीसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन.

Image
प्रतनिधी - सोलापूर  सोलापूर शहर मध्यचे कर्तव्य दक्ष आमदार मा.देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळा श्री.जांबमुनी मोची समाज अध्यक्ष मा.करेपा जंगम ,माजी सेक्रेटरी रवि नायक म्हेत्रे ,श्री.जांबमुनी प्रशाला चेअरमन मा.श्री.शंकर परूल यांनी पुणे विभागीय कार्यीलयात दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी च्या राज्य सरकारच्या नियोजन विकास समितीच्या बैठकीत उपस्थित राहून मा.आ.देवेंद्र दादा कोठे यांनी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलु वाय.एच. हे कोरोना महामारी पूर्वी चे वैद्यकीय अधिकारी म्हणून 3/2/2014 सालापासुन सेवेत कार्यरत असताना प्रमाणिकपणे 8वर्षे सेवा दिली आहे.  सेवेत कार्यरत असताना कोरोना संसर्गाचा तीन लाटेत उत्तम प्रकारे काम काज  पार पाडले आहे मुद्रा सनसिटी नागरिक आरोग्य केंद्राचे कामकाज नियमानुसार पहिल्या लाटेत पार पाडले आहे. सदर मनपा प्रशासन ने नियमबाह्य त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कोरोना चे चुकीचे व असंबदीत एकाच कारणाने  दुसऱ्यांदा अन्याय कारक कारवाई केल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय.एच.यांच्या वर अन्याय झाल्याचे व आर्थिक नुकसान ...

सोलापूर जिल्हा परिषद मधील लोकाभिमुख चेहरा हरपला, जनता आणि प्रशासनात दुवा म्हणुन कार्यरत असणारे विवेक लिंगराज यांचे अपघातात निधन.

Image
प्रतिनीधी -सोलापूर  सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटनेचे नेते विवेक लिंगराज यांचा ही समावेश असल्याचे समोर येत आहे.  विवेक लिंगराजच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी तसेच नातेवाईक यांची मोठी गर्दी सिव्हील हॉस्पिटल मध्ये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बलकर क्रमांक एम एच 44 यू 74 95 हे मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ताबा सुटल्याने बलकरने दुचाकीला धडक दिली. व उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तोहिद माजीद कुरेशी वय वर्ष 20 राहणार सरवदे नगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान वय वर्ष 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकान...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयांची सुप्रिया गायकवाड उत्तीर्ण.

Image
प्रतिनीधी- मुरुम   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र शासन मंत्रालय महसूल विभागातील महसूल सहाय्यक या पदाच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण  होऊन निवड झाल्याबद्दल कु.सुप्रिया गायकवाड हिचा सत्कार आणि अभिनंदन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांचा हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गायकवाड यांनी 2024 मध्ये मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून  तिची मंत्रालय महसूल सहायक म्हणुन  निवड झाली आहे.  येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 12 वी विद्यान उत्तीर्ण झाल्यानंतर बी ए आणि एमए याच महाविद्यालयात शिकत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. महाविद्यालय करिअर कट्टा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि ग्रंथालय अभ्यासिका ची मदत झाली असे गायकवाड हिने म्हंटले आहे.  यावेळी प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य प्रा. जी एस मोरे डॉ  व्ही डी देवरकर यांची उपस्थिती होती.  या यशाबद्दल कु.सुप्रिया गायकवाड हिचे भारत शिक्षण संस्थेचे ...

प्राचार्य हरिदास विधाते यांना रंगकर्मी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित

Image
मुरुम -प्रतिनीधी दि.8 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे संपन्न झालेल्या 3 -या लोकसंस्कृती साहित्य संमेलनात आष्टी-कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिदास विधाते यांना रंगकर्मी प्रतिष्ठानचा शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव, स्वागताध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रमेश अंबरखाने, सिने अभिनेता चंद्रशेखर सांडवे, रंगकर्मी प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड,सौ.डाँ.मंगल हरिदास विधाते,डाँ.सत्यजीत हरिदास विधाते आदि मान्यवर उपस्थित होते.              प्राचार्य हरिदास विधाते हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर येथे व्यवस्थापन परिषदे बरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगीरी बजावली आहे.त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना त्यांना देण्यात आला आला आहे. हा मानाचा व प्रतिष्ठेचा दिला जाणारा पुरस्कार ...

देशभक्तीचे जाज्वल्य प्रतिबिंब म्हणजे भारतीय सैनिक -डॉ. मल्लेश झुंगा स्वामी.

Image
देशभक्तीचे जाज्वल्य  प्रतिबिंब म्हणजे भारतीय सैनिक -डॉ. मल्लेश झुंगा स्वामी. सैनिक उमाकांत सुलपुले यांचा सेवानिवृत्ती समारोह सोहळा संपन्न. देगलूर :- हिंदूसम्राट प्रतिनिधी शशिकांत पटणे   देशासाठी चोवीस तास उन, वारा,थंडी पाऊस, शून्य अंशापेक्षाही कमी तापमानात सीमेवर खडा पहारा देणाऱ्या भारतीय  सैनिकांच्या असीम कार्यामुळेच आज आपला देश आणि आपण सुरक्षित आहोत. हे शक्य आहे ये त्यांचा हृदयात ठासून भरलेल्या देशभक्ती मुळेच.कारण देशभक्तीचे जाज्वल्य प्रतिबिंब म्हणजेच भारतीय सैनिक होय.असे प्रतिपादन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे डॉ. मल्लेश झुंगा स्वामी यांनी केले.ते येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्त भारतीय सैनिक उमाकांत बसलिंगअप्पा सुलपुले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते. उमाकांत सुलपुले यांच्या सेवापुर्ती सोहळा समारोहाच्या अध्यक्ष स्थानी उदगीर भूषण डॉ. मल्लेश झुंगा स्वामी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती  अँड.रामराव नाईक, देगलूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मारोती मुंढे,प...

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीदिनी विविध संघटनांच्या वतीने संयुक्त सलामी.

Image
  प्रतिनिधी-सोलापूर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीदिनी माता रमाई आंबेडकर पुतळा,वाडिया कॉलेजसमोर पुणे येथे नियोजित-शाक्य शौर्य विजय स्तंभ सेवानिवृत्त पोलीस संघ, पुणे व यशसिद्धी माजी सैनिक (महार रजिमेंट) यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंतीनिमित्त शुक्रवारी, ७ फेब्रुवारी रोजी सलामी देऊन साजरी करण्यात आली. यावेळी बार्टी पुणे चे महासंचालक सुनील वारे यांनी बार्टी च्या विविध योजनांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  विठ्ठल गायकवाड प्रमुख माता रमाई स्मारक यांनी माहिती व संघाला मदतीचे आश्वासन दिले. यावेळी बापू पोळके, (माजी  कॅप्टन), अशोक दिलपाक, (शाक्य संघ, नियोजित-महाराष्ट्र संघटक), शिवपुत्र घटकांबळे (यशसिद्धी माजी सैनिक उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), सुभाष सर्वगोड, नवनाथ आडसुळ, अर्जुन कांबळे, अशोक चवरे, कलप्पा तेरदाळ, फुलचंद वाघमारे, पद्माकर सकपाळ, संतोष वानखेडे, राजू नाईकनवरे, रामचंद्र यादव, पोपट आल्हाट, बुद्धा चव्हाण, रमेश सोनवणे व इतर सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते . -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,स...

सोलापूर (विमानतळ)एअरपोर्टचे मॅनेजर मा.सज्जन निचळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त LICचे अधिकृत विमा अधिकारी सचिन जोकारे व LIC समूहातर्फे सत्कार.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर (विमानतळ)एअरपोर्टचे मॅनेजर मा.सज्जन निचळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  LICचे अधिकृत विमा अधिकारी सचिन जोकारे व LIC समूहातर्फे  मा.सज्जन निचळ यांची सदिच्छा भेट देऊन पुष्पहार घालून व बुके देऊन यथोचित सत्कार केला व निचळ  साहेबांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकृत LIC अधिकारी सचिन जोकारे,विमा प्रतिनिधी संतोष मुगळे,रेवणसिद्ध पुजारी,संजय शेळके, होटकर, माणिकप्रभू शिंदे, वजीर शेख,प्रवीण वाघमोडे,सचिन कोपड, विश्वनाथ दुधनी आदी विमा प्रतिनिधी बांधव उपस्थित होते.   -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार(दादा)करजगी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त LIC चे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे व मित्रपरिवारा तर्फे सत्कार.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूरचे भूमिपुत्र व गिरणी कामगारांचे भाग्यविधाते प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार (दादा)करजगी यांच्या ७६व्या  वाढदिवसानिमित्त भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC चे अधिकृत प्रतिनिधी सचिन जोकारे  यांनी सोलापुरातील मा.कुमार(दादा) सदिच्छा भेट देऊन दादांना भारतीय आयुर्विमा महामंडळाची डायरी भेट म्हणून दिली तसेच कुमार(दादा)करजगी यांचा शाल पुष्पहार घालून व बुके देऊन यथोचित सत्कार केला व कुमार करजगी यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना  सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी केली. याप्रसंगी  मा.कुमार(दादा)करजगी यांच्या ७६व्या  वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी LIC चे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे  यांच्या समवेत त्यांचे सहकारी  जिवलग मित्र तथा विमा प्रतिनिधी संतोष मुगळी, परशुराम चाबुकस्वार व पत्रकार सिध्दार्थ भडकुंबे उपस्थित होते.   -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार (दादा)करजगी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त अशोकराव देवकते यांनी दिल्या शुभेच्छा.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूरचे भूमिपुत्र व गिरणी कामगारांचे भाग्यविधाते प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार (दादा)करजगी यांच्या ७६व्या  वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समितीचे माजी सभापती अशोकराव देवकते यांनी सोलापुरातील बाळे येथे कुमार दादा करजगी यांच्या स्वग्रही सदिच्छा भेट देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन कुमार करजगी यांचा सत्कार केला.त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना केली.   -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी स्वामीराव गायकवाड यांची निवड.

Image
अक्कलकोट(प्रतिनिधी) राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या पत्रकारांच्या उन्नतीसाठी देश पातळीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी अक्कलकोट येथील पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यातील नूतन कार्यकारिणी निवडीची दिनांक २८ जानेवारी रोजी पुणे येथे  बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे ,ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमणी , सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे , राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आले. अक्कलकोट येथील पत्रकार स्वामीराव गायकवाड हे गेल्या २५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत...

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि. ०६ ते ०८ फेब्रुवारी रोजी आयोजन-सिईओ कुलदीप जंगम

Image
प्रतिनिधी-सोलापूर दिनांक ०६ प ०७ फेब्रुवारी रोजी र्धा जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर, शासकीय मैदान नेहरूनगर, ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे क्रीडा स्पर्धा तर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा ०८ फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम  यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीची सहविचार सभा घेणेत आली.  या सहविचार सभेसाठी जि.प. क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहप्रमुख. संदिप कोहिणकर, एस.बी. ठोंबरे, विशेष निमंत्रीत सदस्य नरेंद्र पवार, सचिव स्मिता पाटील, सहसचिव. अनिल जगताप, संजय सांवत, सदस्य श्रीम. मिनाक्षी वाकडे., इशाधिन शेळकंदे,.अमोल जाधय,. एस. व्ही. कुलकर्णी,. कादर शेख,. संतोष नवले. प्रसाद मिरकले,सांस्कृतिक विशेष निमंत्रीत सदस्य श्रीम. सिमा यलगुलवार,. सुमित फुलमामडी,. प्रशांत बडवे. गोवर्धन कमटम,किरण लोंढे, क्रीडा विशेष निमंत्रीत सदस्य रविंद्र चव्हाण,. गणेश पवार,. संतोष जाधव, सचिन जाधव, विवेक लिं...