दिल्ली कार्यशाळेसाठी सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची निवड ;अक्कलकोट तालुक्यातील एकमेव सरपंच.
प्रतिनिधी-अक्कलकोट
आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुषंगाने पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने चार व पाच मार्च रोजी होणाऱ्या शासकीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातील चपळगावचे सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची निवड झाली आहे.
दिल्ली येथील कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ४० तर सोलापूर जिल्ह्यातून ७ महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.यामध्ये संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून चपळगावच्या सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी ज्या ज्या सरपंचांची धडपड आहे अशा महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळके यांच्याकडून सांगण्यात आले.सदर निवडीबद्दल देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,माजी सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील, संस्थाध्यक्ष रविकांत पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील,बसवराज बाणेगांव, उपसरपंच सुवर्णा कोळी, जेष्ठ नेते अंबणप्पा भंगे,ग्रामसेवक सोमलिंग कणगी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी कौतुक केले आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240