प्राचार्य हरिदास विधाते यांना रंगकर्मी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित



मुरुम -प्रतिनीधी
दि.8 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे संपन्न झालेल्या 3 -या लोकसंस्कृती साहित्य संमेलनात आष्टी-कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिदास विधाते यांना रंगकर्मी प्रतिष्ठानचा शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव, स्वागताध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रमेश अंबरखाने, सिने अभिनेता चंद्रशेखर सांडवे, रंगकर्मी प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड,सौ.डाँ.मंगल हरिदास विधाते,डाँ.सत्यजीत हरिदास विधाते आदि मान्यवर उपस्थित होते. 
            प्राचार्य हरिदास विधाते हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर येथे व्यवस्थापन परिषदे बरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगीरी बजावली आहे.त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना त्यांना देण्यात आला आला आहे.हा मानाचा व प्रतिष्ठेचा दिला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कथाकार अंबादास केदार, प्रा.डाँ.सुधीर पंचगल्ले , लक्ष्मण बेंबडे, रसुल पठाण, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर,यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर