महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी स्वामीराव गायकवाड यांची निवड.



अक्कलकोट(प्रतिनिधी)
राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या पत्रकारांच्या उन्नतीसाठी देश पातळीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी अक्कलकोट येथील पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यातील नूतन कार्यकारिणी निवडीची दिनांक २८ जानेवारी रोजी पुणे येथे  बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे ,ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमणी , सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे , राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आले. अक्कलकोट येथील पत्रकार स्वामीराव गायकवाड हे गेल्या २५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून विविध वृत्तपत्रातून त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम पत्रकार स्वामीराव गायकवाड यांनी केले आहे .या कार्याची दखल घेत पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे ,संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे , राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव ,राज्याचे कार्याध्यक्ष निलेश सोमणी रणधीर कांबळे , राज्याचे नूतन अध्यक्ष गोविंद वाकडे व सर्वच पदाधिकाऱ्यानी अभिनंदन  करून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व संघटनेच्या वाढीसाठी काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 --------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर