जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडे वस्ती- क्षेत्रभेटी अंतर्गत शैक्षणिक सहल.


प्रतिनिधी -सोलापूर 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडे वस्ती- क्षेत्रभेटी अंतर्गत शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने सोलापूर येथे- पार्ले जी बिस्कीट कंपनी ला प्रथम भेट देण्यात आली. त्यानंतर सोलापूरचे आराध्यैवत श्रीयोगी सिद्धरामेश्वर मंदिर या ठिकाणी भेट देण्यात आली.  मंदिराच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी मंत्री ,विद्यमान उत्तर सोलापूरचे आमदार श्री.विजयकुमार देशमुख साहेबांची  भेट झाली आणि मुलाबरोबर त्यांनी फोटो काढला आणि मुलांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध असा आदिलशाच्या काळात बांधलेला भुईकोट किल्ला मुलांना दाखवण्यात आला .किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती देण्यात आली. मुलांनी किल्ल्यातील गार्डनमध्ये भरपूर आनंद घेतला आणि अनेक प्रकारचे खेळण्या होत्या त्यामुळे त्या खेळण्याचा आनंद मुलाने लुटला  त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद अत्यंत ओसंडून वाहत होता. भुईकोट किल्ल्यातील उपयुक्त माहिती मुलांना देण्यात आली आणि मुलाने प्रत्यक्ष किल्ले बघितले .
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर