महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल- रात्री त्र १० ते १२ या वेळेत महापूजा व आरती.
प्रतिनिधी -अक्कलकोट
सालाबादाप्रमाणे यंदाही येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील दिनचर्येत व स्वामींच्या नित्योपचारात पारंपारीक पध्दतीचे बदल करण्यात आले आहेत अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. सालाबाद प्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती महाशिवरात्रीमुळे होणार नाही. महाशिवरात्री रोजी रात्री १० ते १२ या वेळेत पुरोहीत मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या विधीवत मंत्रोच्चारात रुद्राभिषेक व महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री बारा वाजता श्रींची आरती होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहीतीही महेश इंगळे यांनी याप्रसंगी दिली तसेच यावेळी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाविकांना केले आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240