देशभक्तीचे जाज्वल्य प्रतिबिंब म्हणजे भारतीय सैनिक -डॉ. मल्लेश झुंगा स्वामी.

देशभक्तीचे जाज्वल्य  प्रतिबिंब म्हणजे भारतीय सैनिक -डॉ. मल्लेश झुंगा स्वामी.
सैनिक उमाकांत सुलपुले यांचा सेवानिवृत्ती समारोह सोहळा संपन्न.


देगलूर :-
हिंदूसम्राट प्रतिनिधी शशिकांत पटणे 
देशासाठी चोवीस तास उन, वारा,थंडी पाऊस, शून्य अंशापेक्षाही कमी तापमानात सीमेवर खडा पहारा देणाऱ्या भारतीय  सैनिकांच्या असीम कार्यामुळेच आज आपला देश आणि आपण सुरक्षित आहोत. हे शक्य आहे ये त्यांचा हृदयात ठासून भरलेल्या देशभक्ती मुळेच.कारण देशभक्तीचे जाज्वल्य प्रतिबिंब म्हणजेच भारतीय सैनिक होय.असे प्रतिपादन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे डॉ. मल्लेश झुंगा स्वामी यांनी केले.ते येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्त भारतीय सैनिक उमाकांत बसलिंगअप्पा सुलपुले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते.उमाकांत सुलपुले यांच्या सेवापुर्ती सोहळा समारोहाच्या अध्यक्ष स्थानी उदगीर भूषण डॉ. मल्लेश झुंगा स्वामी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती  अँड.रामराव नाईक, देगलूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मारोती मुंढे,पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, शिवानंद स्वामी,येरगी चे सरपंच तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संतोष पाटील, 
प्रा.एस.एल.देशमुख,अँड.वीरभद्र माळगे, मल्लिकार्जुन स्वामी, हडोळतीकर,युवा उद्योजक गणेश स्वामी,प्रशांत पाटील आचेगावकर, विश्वनाथ पाटील,माजी सरपंच बसलिंगप्पा सुलपुले,अशोक मजगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश पारसेवार यांनी केले .प्रास्ताविकातून उमाकांत सुलपुले यांचं शालेय जीवनापासून ते भारतीय सैनिक म्हणून सेवानिवृत्ती पर्यंतच्या कालखंडाचा उलगडा केला.यानंतर शिवानंद स्वामी, अँड.रामराव नाईक,संतोष पाटील,अशोक मजगे, बसलिंगप्पा सुलपुले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मल्लेश झुंगा स्वामी पुढे म्हणाले की आपल्या मुलाला भारतीय सैनिक म्हणून पाठविणाऱ्या आई वडिलांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.आपला मुलगा घरी परत येईल का नाही याची धुक धुक हृदयात साठवून ठेवत आपले जीवन जगत असतात. सैनिकाची पत्नी चे जीवन सुद्धा एक समर्पण आहे. डॉ.स्वामी यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले की प्रत्येक आईने आपल्या पाल्याला मातृभूमी वर प्रेम करायला शिकवावे.जेणेकरून देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत प्रत्येक घरातून एक मूल देशसेवेसाठी भारतीय सैन्यामध्ये पाठवले पाहिजे.यानंतर मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्यास उत्तर देताना उमाकांत सुलपुले यांनी भावनिक होत आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमात सेवानिवृत्त सैनिक उमाकांत सुलपुले यांचा व त्यांच्या आईवडिलांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आगलावे यांनी केले तर आभार हणमंत सुलपुले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश पारसेवार,अभिजीत मदनुरकर, राजेश उल्लीवार, संजय स्वामी, उदय कदम वैभव सुलपुले,ओमकार सुलपुले ,मित्रमंडळी व नातेवाईक यांनी परिश्रम केले.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर