सोलापूर जिल्हा परिषद मधील लोकाभिमुख चेहरा हरपला, जनता आणि प्रशासनात दुवा म्हणुन कार्यरत असणारे विवेक लिंगराज यांचे अपघातात निधन.



प्रतिनीधी -सोलापूर 
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटनेचे नेते विवेक लिंगराज यांचा ही समावेश असल्याचे समोर येत आहे. 
विवेक लिंगराजच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी तसेच नातेवाईक यांची मोठी गर्दी सिव्हील हॉस्पिटल मध्ये झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बलकर क्रमांक एम एच 44 यू 74 95 हे मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ताबा सुटल्याने बलकरने दुचाकीला धडक दिली. व उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात तोहिद माजीद कुरेशी वय वर्ष 20 राहणार सरवदे नगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान वय वर्ष 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर या तिघांचा मृत्यू झाला.तर सात ते आठ जण जखमी झाले आहे.
जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करत आहेत.

--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.