सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु वाय.एच.यांच्या फेर नियुक्तीसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन.
प्रतनिधी - सोलापूर
सोलापूर शहर मध्यचे कर्तव्य दक्ष आमदार मा.देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळा श्री.जांबमुनी मोची समाज अध्यक्ष मा.करेपा जंगम ,माजी सेक्रेटरी रवि नायक म्हेत्रे ,श्री.जांबमुनी प्रशाला चेअरमन मा.श्री.शंकर परूल यांनी पुणे विभागीय कार्यीलयात दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी च्या राज्य सरकारच्या नियोजन विकास समितीच्या बैठकीत उपस्थित राहून मा.आ.देवेंद्र दादा कोठे यांनी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलु वाय.एच. हे कोरोना महामारी पूर्वी चे वैद्यकीय अधिकारी म्हणून 3/2/2014 सालापासुन सेवेत कार्यरत असताना प्रमाणिकपणे 8वर्षे सेवा दिली आहे.
सेवेत कार्यरत असताना कोरोना संसर्गाचा तीन लाटेत उत्तम प्रकारे काम काज पार पाडले आहे मुद्रा सनसिटी नागरिक आरोग्य केंद्राचे कामकाज नियमानुसार पहिल्या लाटेत पार पाडले आहे. सदर मनपा प्रशासन ने नियमबाह्य त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कोरोना चे चुकीचे व असंबदीत एकाच कारणाने दुसऱ्यांदा अन्याय कारक कारवाई केल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय.एच.यांच्या वर अन्याय झाल्याचे व आर्थिक नुकसान झाल्याचे बाब मा.पुणे विभागीय आयुक्त मा.चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांना वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन सदरील अन्याय कारक कारवाई शिथिल करण्याचे आदेश मनपा सोलापूर प्रशासनस देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलु वाय.एच. यांना मनपा आरोग्य विभाग मध्ये पुर्ववत प्रथम नियुक्ती नुसार सेवेत फेरनियुक्ती देण्याचे आदेश व अनेक वर्षापासुन शासन दरबारी प्रलंबित असलेले श्री.जांबमुनी प्रशालेला नियोजित जागा समाज संस्थेला शासनाकडून हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या कडे लेखी पत्राने शिफारस व निवेदन केली आहे. मा.पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आ.देवेंद्र दादा कोठे यांचे शिफारस ग्राहय धरून व वस्तुस्थिती ने सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय.एच.यांना सेवेत फेरनियुक्ती चे आदेश देऊन लवकरात लवकर न्याय देण्यात येईल व तसेच श्री.जांबमुनी प्रशालेला जागा हस्तांतरण चे पुणे विभागाचे प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र शासन मुंबई कडे पाठवण्यात येईल असे म्हणाले आहे.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240