छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने जिल्हा परिषद परिसर दुमदूमला;जिल्हाधिकारी व सिईओ यांनी केले पालखी चे सारथ्य..!













प्रतिनीधी - सोलापूर 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने  परिसर दुमदूमला…छत्रपती शिवाजी महाराज कि जय…जय भवानी व जय शिवाजी चेया
गजरानं आज जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी उद्यान दुमदुमून गेले होते. आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हा परिषदेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी उद्यान शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे प्रशासकता मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  मीनाक्षी  वाकडे, अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा जल व्यवस्थापन अधिकारी पारसे, मराठा सेवा संघाचे शाखाध्यक्ष  अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अरूण क्षिरसागर, अधिक्षक  अनिल जगताप, चंद्रकांत होळकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, पतसंस्था क्र १ चे चेअरमन डाॅ. माने, चेतन वाघमारे प्रमुख उपस्थित होते. 
जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करणेत आली.
जिल्हाधिकारी , सिईओंनी यांनी नेली खांद्यावरून पालखी..!











सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 व्या जयंती उत्सव निमित्त केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ कुलदीप जंगम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवले पालखीला खांदा देऊन पालखी वाहून नेली. संभाजी आरमार च्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी युवा नेते मनिष देशमुख, संभाजी आरमारचे  श्रीकांत बापू डांगे, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी (तात्या) वाघमोङे उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिंक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते हाजी मलंग नदाफज्, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत हजारो विद्यार्थी, नागरिक यांची जय शिवाजी जय भारत पदयात्रेत सहभागी झाले होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर