महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयांची सुप्रिया गायकवाड उत्तीर्ण.











प्रतिनीधी- मुरुम  
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र शासन मंत्रालय महसूल विभागातील महसूल सहाय्यक या पदाच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण  होऊन निवड झाल्याबद्दल कु.सुप्रिया गायकवाड हिचा सत्कार आणि अभिनंदन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांचा हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गायकवाड यांनी 2024 मध्ये मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून  तिची मंत्रालय महसूल सहायक म्हणुन  निवड झाली आहे. 
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 12 वी विद्यान उत्तीर्ण झाल्यानंतर बी ए आणि एमए याच महाविद्यालयात शिकत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. महाविद्यालय करिअर कट्टा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि ग्रंथालय अभ्यासिका ची मदत झाली असे गायकवाड हिने म्हंटले आहे. यावेळी प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य प्रा. जी एस मोरे डॉ  व्ही डी देवरकर यांची उपस्थिती होती. 
या यशाबद्दल कु.सुप्रिया गायकवाड हिचे भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे,  सरचिटणीस जनार्दन साठे,  सचिव पद्माकर हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे आदींनी अभिनंदन केले आहे
.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर