श्री वटवृक्ष मंदिरामुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर - न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी.

न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळे व स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती येत आहे. या प्रचितीमुळेच भाविकांचा कल स्वामी दर्शनाकडे नित्य वाढतच आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजनबद्ध दर्शनसेवा, विनम्रभावे आदरितिथ्य या सर्व आध्यात्मिक पैलुंमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र हे आज मितीस सर्वोच्च स्थानावर आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दूर पसरली असल्याचे मनोगत सोलापूरचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ईश्वर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी बोलत होते. याप्रसंगी श्रीशैल गवं...