अतिवृष्टी व पुरामुळे मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

प्रतिनिधी-सोलापूर
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टी व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मंगळवेढा तहसीलदार सचिन लंगोटे यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात शिंदे यांनी नमूद केले की, कापूस, सोयाबीन, तुर यांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना सुसह्य व शाश्वत मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी जि. प. सदस्य अर्जुन पाटील, दामाजी कारखाना संचालक राजेंद्र चरणु पाटील, प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी रविकिरण कोळेकर, सिद्धू कोकरे, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, समाधान हाके, पद्मिनी शेट्टीयार, पंडित पाटील, सत्तार इनामदार, सचिन पाटील, संजय पाटील हवालदार, रणजीत पाटील, रवी पुजारी, सागर रणे, राजू हवालदार, प्रकाश चौगुले, अशोक मोरे, बिरुदेव कोकरे, काका पुजारी, मल्हारी पाराधे, उत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यामुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने मदतीचे आदेश निघावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर