स्वातंत्र्यदिनानिमित्त रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटकडून अन्नदान.

प्रतिनिधी-अक्कलकोट
स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट शहरातील डी.एड. कॉलेजच्या पाठीमागील झोपडपट्टी परिसरात रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट तर्फे अन्नदान करण्यात आले. गरीब व गरजूंना एक वेळचे जेवण देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
मागील आठ वर्षांपासून रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट शहरातील झोपडपट्टी परिसर, मंदिर परिसर, बसस्थानक, दर्गा परिसर तसेच रस्त्यावरील बेघर, भिकारी, मनोरुग्ण व इतर गरजूंना अन्न पुरविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. हॉटेल, विवाहसोहळे, वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले अन्न गोळा करून गरजूंना पोहचविण्याचे कार्य संस्था करत आहे.
आजच्या अन्नदान उपक्रमाला ज्योतिबा पारखे, सोहेल फरास, रशीद खिस्तके, अशरफ गोलंदाज, मुआज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजात सेवा, सहकार्य आणि संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.