साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती गळोरगी येथे मोठ्या उत्साहात साजरी.

प्रतिनिधी -अक्कलकोट (गळोरगी)
गळोरगी येथे मातंग समाज तरुण मंडळ व ABS Group यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमेचे पूजन वहीदबाशा शेख (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुधनी) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच संतोष कौटगी यांनी केले, तर बाबू जगजिवनराम यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब पाटील (माजी तंटामुक्त अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कैलासभाऊ पाटोळे, उपाध्यक्ष महादेवभाऊ पाटोळे, चंद्रकांत प्रचडे, संतोष जमादार (ग्रामपंचायत ऑपरेटर), शंकर बनसोडे (ग्रामपंचायत सदस्य), राहुल बगले (ग्रामपंचायत कर्मचारी), चंद्रकांत अंदोडगी, ईरणा पुजारी, मोनप्पा हतरकी (युवा नेता), प्रभुलिंग बिराजदार, अजय बिराजदार, धानलिंग वाघमारे, समर्थ बनसोडे (युवा नेता), बिरप्पा अळगी, कैलास अळगी, सिद्धाराम पुजारी, सिदण्णा बिराजदार, मलकप्पा पाटोळे, गौरीशंकर बिराजदार, अविनाश बिराजदार, संतोष हरवाळकर, भोगेश अळगी, अक्षय जाधव, मौलाली नदाफ, संतोष बगले आदी समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकत समाज एकतेचे आणि प्रगतीचे महत्त्व पटवून दिले.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर