सोलापूरात पर्यटन महोत्सवाची जोरदार तयारी

प्रतिनिधी -सोलापूर 
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमातून सोलापूर जिल्ह्याचे ब्रॅण्डिंग करून धार्मिक, सांस्कृतिक, कृषी आणि व्यापार क्षेत्राला नवे बळ मिळावे हा उद्देश आहे.
या महोत्सवाच्या संकल्पनेला आमदार सुभाषबापू देशमुख यांनी पुढाकार देत शिवधनुष्य पेलले आहे. सोलापूर जिल्हा धार्मिक स्थळांनी समृद्ध असून अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी व सोलापूर शहरातील सिद्धेश्वर महाराज मंदिर यांसह अनेक ऐतिहासिक मंदिरे येथे आहेत. या मंदिरांचे धार्मिक पर्यटन वाढविण्याबरोबरच कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे.
सोलापुरी डाळिंब, शेंगा चटणी, कडक भाकरी, रेडिमेड गारमेंट्स, प्रसिद्ध सोलापुरी चादर तसेच हुरडा पार्टी या विशेष गोष्टींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
महोत्सवातील प्रमुख आकर्षणे
रिल्स, माहितीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व परिसंवाद
सेमिनार, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे
जिल्ह्यातील चांगल्या गोष्टी मांडण्याकरिता पारितोषिके
सोशल मीडियावर सोलापूरचे ब्रॅण्डिंग
या उपक्रमात जिल्हा प्रशासनासह कलेक्टर कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, तहसील कार्यालय, नगरपरिषद व ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग असेल.
आमदार सुभाषबापूंच्या मते, “पर्यटन वाढल्यामुळे युवांना रोजगार मिळेल, अर्थकारणाला गती मिळेल आणि सोलापूरचे नाव राज्य, देश व जगभर गाजेल.”
दरम्यान, या पर्यटन महोत्सवाच्या लोगोचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले आहे.
 सोलापूरकरांनो, आता तयारी करा-आपल्या गावातील वैशिष्ट्ये जगाला दाखवण्याची हीच संधी.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर