संस्कार संजीवनी फाउंडेशनचा उपक्रम;आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप.

प्रतिनिधी-सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे संस्कार संजीवनी फाउंडेशन संचालित वंचित विद्यार्थी आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन उळे गावचे उपसरपंच व सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. नेताजी भाऊ खंडागळे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. परमेश्वर काळे सर, सौ. काळे मॅडम, प्रवीण कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमामुळे आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळणार असून संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर