“शिष्यवृत्ती मार्गदर्शनामुळेच मी अधिकारी – गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांचे प्रेरणादायी आवाहन”

प्रतिनिधी -सोलापूर,
 शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा हरीभाई देवकरण प्रशाला,येथील मुळे हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडली.ही कार्यशाळा शिक्षण विभाग उत्तर सोलापूर, नवनीत फाउंडेशन आणि सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेत विविध जिल्ह्यांतील नामवंत शिक्षकांनी मार्गदर्शन केले. नामदेव ज्ञानदेव धनावडे (माचुतर,ता.महाबळेश्वर जि. सातारा) यांनी गणित विषयावर सत्र घेताना सांगितले की, “गणित हे केवळ आकडेमोड नव्हे तर तर्कशक्ती, वेग आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारे साधन आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणारे प्रश्न विचारावेत.”

शामराव धोंडीबा जूनघरे (भोगवली मुरा, ता. जावळी, जि. सातारा) यांनी “बुद्धिमत्ता चाचणी” विषयावर प्रभावी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “ही चाचणी विद्यार्थ्यांच्या निरीक्षण, विश्लेषण आणि कल्पनाशक्तीचा कस पाहते. प्रश्न सोडवताना योग्य रणनीती वापरणे आणि वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.”
तसेच संपत गणपत शेलार (असनी, ता. जावळी, जि. सातारा) यांनी मराठी विषय शिकवण्याच्या सोप्या व प्रभावी पद्धती सांगत विद्यार्थ्यांना भाषेचा गोडवा अनुभवण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी आवाहन केले की, “जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक व परिणामकारक मार्गदर्शन करावे.”
तसेच गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर राजाराम भोंग साहेब यांनी सर्व शिक्षकांना अतिशय सुंदर, प्रेरणादायी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सतत नवनवीन अध्यापन पद्धती अंगीकाराव्यात आणि आत्मविश्वास निर्माण करणारे वातावरण तयार करावे असे सांगितले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नवनीत प्रकाशन ची सुहास काळे सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे संजय जवंजाळ सर शिवाजी पाटील तसेच विषय साधन व्यक्ती बालाजी बलुले ,चंद्रकांत वाघमारे संतोष साळुंखे शितल विधाते,दत्तात्रय शिंदे, पांडुरंग सुर्वे आदींनी परिश्रम विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले तर आभार महताब शेख यांनी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर