‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ उपक्रमाला मुस्ती, बोरामणी, कासेगाव पंचक्रोशीतील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.



प्रतिनिधी-सोलापूर
कारगिल विजय दिनानिमित्त सह्याद्री फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ या उपक्रमाला बोरामणी व आसपासच्या पंचक्रोशीतील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संकलित करण्यात आल्या.
या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा – बक्षीहिप्परग, दोड्डी, मुळेगाव तांडा, पिंजरवाडी, बोरामणी, वडजी, वडजी तांडा, कासेगाव, उळे, संगदरी, उळेवाडी, वरळेगाव, मुस्ती – तसेच शक्ती प्राथमिक आश्रम शाळा मुळेगाव तांडा, श्रीपातराव सोनटक्के हायस्कूल तांदुळवाडी, डी.एन. गायकवाड प्रशाला बक्षीहिप्परग, अनंतराव देवकते प्रशाला वडजी, बसवेश्वर हायस्कूल मुस्ती, शारदानिकेतन विद्यालय आणि स्प्रिंगफील्ड नॅशनल स्कूल, उळे या शाळांचा उल्लेखनीय सहभाग होता.
सर्व संकलित राख्या १५ व्या बटालियन ‘द मराठा लाईट इन्फंट्री’ तुकडीस सुपूर्त करण्यात आल्या असून त्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. यावेळी कर्नल जितिन थॉमस, सुभेदार संभाजी मोरे, सुभेदार उत्तम पाटील, सुभेदार संतोष कोकरे आणि सुभेदार किशोर मापारे उपस्थित होते.
सह्याद्री फाउंडेशनतर्फे एपीआय उमेश रोकडे, सचिव प्रतिभा खंडागळे, प्रा. सविता नलावडे, मंजुश्री रोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थिनींचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर