"क्षयरोग हा प्रतिबंधक उपाय व योग्य उपचाराने बरा होतो" -डॉ. पल्लोलु वाय.एच. (वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र, मनपा,सोलापूर

सोलापूर - प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने मॅडम व शहर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी सिव्हिल UPHC अंतर्गत श्री जांबमुनी प्रशाला, कुमठा नाका, सोलापूर येथे क्षयरोग विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मा. कोरे सर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पल्लोलु वाय.एच. सर (वैद्यकीय अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात डॉ. पल्लोलु यांनी टीबीचे प्रकार, कारणे, प्रसाराची माध्यमे, लक्षणे, निदान पद्धती (जसे की थुंकी तपासणी, CB-NAAT, True-NAAT, छातीचा क्ष-किरण), तसेच DOTS उपचार पद्धती, BCG लस (बालकांसाठी, नवजात बाळांसाठी व प्रौढांसाठी), आर्थिक लाभ योजना, फूड बास्केट याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील संशयित रुग्णांना महापालिकेच्या दवाखान्यात पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ANM अरुणोदय जंगम यांनी केले. नियोजनासाठी ANM शिवकन्या सानप, शिल्पा वानोळे, कोमल सुतार यांनी प्रयत्न केले. PHN कविता पवार यांनी महापालिकेच्या आरोग्य सुविधा व योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमात आशा कार्यकर्त्या अर्चना होटकर, पूजा करली, आरती कामितकर, सुनंदा कमितकर, आफ्रिन लंगडे, वासंती खुणे, शिपाई मा. पी.एन. दयावरकोंडा, तसेच शाळेच्या शिक्षिका मा. लिगाडे मॅडम व हतकरे तौटी मॅडम यांनी सक्रिय सहभाग घेतला.या उपक्रमात एकूण १२० विद्यार्थी उपस्थित होते.
टीबीमुक्त भारतासाठी असे जनजागृती उपक्रम महत्त्वाचे ठरत आहेत.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर