पत्रकार कृती समिती व आप्पाश्री मित्रपरिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.

प्रतिनिधी -सोलापूर,
दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद बागेतील प्रांगणात पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटी को-ऑपरेटिव्ह फेडरेशन संस्थेचे संचालक अभिराज भैया शिंदे, दूर्वांकुर साप्ताहिकाचे संपादक वैभव धोत्रे आणि युवा पत्रकार प्रसाद ठक्का या मान्यवरांचा शाल, टोपी, पुष्पहार घालून तसेच पेढे भरवून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

सत्कारानंतर तिन्ही मान्यवरांनी आयोजक पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. पत्रकार कृती समिती समिती व आप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा वाढदिवसानिमित्त गौरव केला जातो,अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमास पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष तथा अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा आप्पासाहेब लंगोटे,दैनिक जय हो चे संपादक विजयकुमार उघडे, एमडी न्यूज चे संपादक सैपन शेख,युनूस आत्तार,भीमशक्ती मिलिंद(नाना) प्रक्षाळे, लतीफ नदाफ, डी.डी पांढरे,अकबर शेख,राम हुडांरे, सिद्धार्थ भडकुंबे, विलास सरवदे,सुदर्शन सलगर,अस्लम नदाफ, ईसुब पिरजादे,शांतीसागर सरवदे, सतीश धोत्रे, रोहित खिलारे, पप्पू गायकवाड, ओंकार धोत्रे, श्याम कोळी, लक्ष्मण खाडे, निलेश मस्के, रवी रणवीर, मुद्गल आदी मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर