साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात सीसीटीव्ही आणि सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन.

प्रतिनिधी -सोलापूर
 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती आणि क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सीसीटीव्ही यंत्रणा आणि सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे संपन्न झाले.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुरक्षिततेसाठी चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे नागरिकांसाठी दैनंदिन वृत्तपत्रे व नियतकालिकांचे वाचन करता यावे, यासाठी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे.या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, डीसीपी विजय कबाडे, डीसीपी हसन गौर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शांतीलाल साबळे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा संयोजक सुरेश पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, गोविंद कांबळे, लखन गायकवाड, अभिषेक हटकर, विश्वेसर गायकवाड, ओंकार पाटोळे, शुभम पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत, त्यांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सार्वजनिक वाचनालयामुळे तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल व वाचनसंस्कृती वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीलाल साबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश पाटोळे यांनी केले.
संयोजकांनी सांगितले की, या उपक्रमांमुळे परिसरात सुरक्षा वाढेल आणि सामाजिक-सांस्कृतिक वातावरण समृद्ध होईल.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर