श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात सातत्य-माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचे मनोगत.

मा.आयुक्त पुणे महापालिका राजेंद्र भोसले यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, तहसीलदार विनायक मगर व अन्य मान्यवर.
प्रतिनिधी-अक्कलकोट
येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त तथा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी (IAS) आणि सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सहकुटुंब देवस्थानास भेट देण्यासाठी आले होते.
दर्शनानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “अनेक वर्षांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन लाभले. हे दर्शन माझ्या व कुटुंबासाठी संस्मरणीय ठरले आहे. श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र मिळणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. एकंदरीत देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पुर्वीसारखेच सातत्य असून मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण स्तुत्य आहे.”
याप्रसंगी देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
कार्यक्रमाला तहसीलदार विनायक मगर, तलाठी सुहास डोईफोडे, देवस्थान सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी तसेच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर