कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी महासंघाचा पाठपुरावा.

प्रतिनिधी -सोलापूर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे नागपूर येथे लक्षवेधी धरणे आंदोलन केले. प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करताना निवेदनातून मागण्यांकडे लक्ष वेधले. महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे अधिवेशनावेळी धरणे दिले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांच्या नावाने निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की दिवसेंदिवस शिक्षकांच्या समस्या वाढत आहेत. प्रलंबित मागण्यांमध्ये प्रामुख्याने नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानावरील शिक्षक, अर्धवेळ शिक्षक नियुक्ती निकषात असूनही त्याच्यावर जुनी पेन्शनबाबत झालेला अन्याय दूर करावा. एक नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अंशतः अनुदानित शाळा शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ मिळावी. मान्यताप्राप्त आयटी शिक्षकांच्या समायोजनाबाबतचा शासनादेश निर्गमित करावा. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. निवड श्रेण...