वटवृक्ष मंदीरातील बदल पाहून भारावलो - आयकर आयुक्त महेश कुमार
प्रतिनिधी-अक्कलकोट,
आज जवळपास ६ वर्षानंतर अक्कलकोटला येऊन स्वामींचं दर्शन घेण्याचा योग आला. या मोठ्या कालावधीनंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज बरेच बदल आपणास पहावयास मिळाले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मोठ्या तळमळीने मंदिरात विविध बदल घडवून भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शनाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. येथील गाभाऱ्यातील नयनरम्य नूतनीकरण असो, मंदिर परिसरातील सुशोभीकरण असो वा स्वामी समर्थांची प्रसन्न भावमुद्रा हे सर्व पाहिल्यानंतर मनाला अत्यंत प्रसन्नता लाभत आहे. त्यामुळे निश्चितच भाविकांनाही प्रसन्न चित्ताने स्वामी दर्शन घेण्याचा लाभ होईल. या पाश्वभुमीवर आपणही वटवृक्ष मंदीरातील झालेले हे बदल पाहून भारावलो असल्याचे मनोगत ठाणे आयकर विभागाचे मुख्य आयुक्त महेश कुमार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी महेश कुमार व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सपत्नीक यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आयुक्त महेश कुमार बोलत होते. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष पराणे, धनराज स्वामी, दर्शन घाटगे,
श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, संजय पवार, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी, इत्यादी उपस्थित होते.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240