तात्या पार्क येथे माऊली समाधी सोहळा साजरा



ओम श्रीहरी निवास.ह.भ.प. डॉ.शिवाजी महाराज व्हनकडे सर यांचे निवासस्थानी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 728 व्या संजीवनी समाधी सोहळा आणि वै.ह.भ.प. पांडुरंग महाराज व्हनकडे यांच्या 31 वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त हरिपाठ सह संगीत शास्त्रोक्त भजनाने उत्साहात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला.
ज्ञानदेव म्हणता माया I गेली समोर विलया II 
देव निवृत्तीने धरिले दोन्ही कर I
जात व ज्ञानेश्वर बैसावया II 
नामा म्हणे आता लोपला दिनकर I
जात बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ II 
माझ्या वडिलांची मिराशी गा देवा I
तुझी चरण सेवा साधावया II 
आधी व इतर अभंग गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
यावेळी ह.भ.प. सदाशिव चौरे सर, प्रभाकर वाघचौरे हरिहर मोरे सर,नागनाथ पाटील,गोविंद माने,विलास कोकीतकर, अचुत मोफरे ,सचिन गायकवाड, राम मदने, संभाजी घुले,चैतन्य लोंढे,पोपट माळी, राजेंद्र वारगड,अरुण शिखरे,किरण शेटे,विठ्ठल कुलकर्णी, कृष्णा घंटे, शांतया स्वामी , नागनाथ गायकवाड आधी सह अनेक भजनी मंडळाचे प्रमुख महाराज मंडळींच्या उपस्थित  गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर भक्तिमय वातावरणात सर्व  मंडळींना महाप्रसाद देण्यात आला. शेवटी उपस्थित महाराज मंडळी , वारकरी, वादक,गायक  तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल,श्रीफळ देऊन उचित असा सत्कार करुन  डॉ. शिवाजी व्हनकडे सर आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.