वटवृक्ष मंदीरात डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींची ११९ वी मासिक सेवा संपन्न.
प्रतिनिधी-अक्कलकोट
(श्रीशैल गवंडी, अ.कोट-दि.२०/१२/२४)
आज येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींची विविध धार्मिक कार्यक्रमांची ११९ वी मासिक सेवा मोठ्या भक्ती भावात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचा मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट-दि.२०/१२/२४)
आज येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींची विविध धार्मिक कार्यक्रमांची ११९ वी मासिक सेवा मोठ्या भक्ती भावात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचा मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी बोलताना डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळीचे प्रमुख सोमदत्त आसोलकर यांनी सद्गुरु चैतन्यस्वरूप अण्णा लिमये यांच्या श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार आणि प्रसार या कार्याअंतर्गत पदयात्रा, जप, नामस्मरण, मानसपुजा, कीर्तन, भजन, गायन या सेवेत, अध्यात्मिक उन्नती सोबत स्वामी सेवकांसाठी हक्काचे मनोरंजनाचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून अक्कलकोट मासिक कीर्तन सेवेचे आयोजन "श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट" चे सन्माननीय अध्यक्ष महेशजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, "स्वामी हो" गृप आणि "डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळी" करत आलेले असल्याचे मनोगत व्यक्त केले. या मासिक सेवेत अक्कलकोट स्वामींच्या कालच्या ११९ व्या मासिक कीर्तन सेवेदरम्यान डिसेंबर महिन्याचा जप, नामस्मरण, मानसपूजा सकाळच्या सत्रात पार पडली. मानसपुजेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत डिंगोरकर आणि संतोष रहाटे यांनी केले. नेहमीच्या प्रथेप्रमाणे गृप सोबत प्रथम आलेल्या स्वामी सेवकांकडून मानसपुजेचा प्रसाद श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी अर्पण करण्याचे भाग्य आपणा सर्वांस लाभले. त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवार निमित्ताने वैभव लक्ष्मी पुजा आणि श्रीमहालक्ष्मी माहात्म्य कथेचं पठण करण्यात आले. त्यानंतर मानसपुजेचा प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात २.३० ते ३.३० या वेळेत सौ.अनिता सपकाळ संचालित सरगम भजनी मंडळ अंबरनाथ यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम खूपच अप्रतिम झाला.
तद्नंतर ११९ वी मासिक कीर्तन सेवा ह.भ.प.बळवंत तेंडोलकर बुवा, बदलापूर यांच्या नारदीय कीर्तनाने संपन्न झाली. तबला वादक सुनील शेलार सर, अंबरनाथ व हार्मोनियम वर मयूर स्वामी, अक्कलकोट यांनी कीर्तनकारांना उत्तम साथसंगत केली. या सर्व कार्यक्रमास श्रोत्यांनीही मोठी गर्दी केली होती.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240