सोलापूर जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करणेत आले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर सर यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला. समाज कल्याण विभागाचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरगणे, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी पारसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, कास्ट्राईब संघटनेचे मार्गदर्शक अरूण क्षिरसागर, कक्ष अधिकारी विवेक लिंगराज , कक्ष अधिकारी गिरीष जाधव, कक्ष अधिकारीअविनाश गोडसे, कक्ष अधिकारी सचिन सोनकांबळे , कक्ष अधिकारी सचिन साळुंखे , प्रमुख उपस्थित होते. यानंतर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याच्या ठिकाणी सिईओ कोहिणकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून विभाग प्रमुखांसह अभिवादन केले. आरोग्य विभाग येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. अधिक्षक उत्कर्ष इंगळे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240