एन.ए.बी.निवासी अंधकार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, ब्रेल वाचन, गायन स्पर्धा व प्रभात फेरीचे आयोजन.
प्रतिनिधी-सोलापूर
एन.ए.बी निवासी अंधकार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा,ब्रेल वाचन, गायन स्पर्धा घेण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिक वसाहत, पद्मा नगर, कर्णिक नगर या भागात प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅब संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.अंकुश कदम सर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.समाज कल्याण अधिकारी मा.श्री. सचिन कवले सर यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा.दिल्या.
मा.समाजकल्याण अधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये आलेल्या प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोग बक्षिसे देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सर्वांचा निर्धार दिव्यांगांचा स्वीकार, दिव्यांगांचा सन्मान हाच आमचा अभियान, तुमचा आमचा एकच नारा, दिव्यांगांना देऊ सहारा इ.घोषवाक्य दिले परिसरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेचे अधिक्षक श्री.रामचंद्र कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांग विषयीच्या योजना, शासकीय व शैक्षणिक सवलती याविषयी विस्तृत माहिती दिली. प्रभातफेरीसाठी कार्यशाळेचे रियाज मुल्ला सर व आकांक्षा भंडारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरप्पा वाघे तर शिवशरण गडदुरे आभार प्रदर्शन यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी संजय कलाल,श्रीनिवास समदूर्ले,शुभम वांझरे, संदेश कांबळे यांचे सहकार्य मिळाले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240