स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय - वृषालीराजे भोसले
![]() |
वृषालीराजे भोसले यांचा सत्कार करताना महेश इंगळे, अमोलराजे भोसले, व्यंकटेश पुजारी दिसत आहेत. |
प्रतिनिधी-अक्कलकोट
स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांप्रमाणे माझ्या कुटूंबियांसह मलाही श्री. स्वामी समर्थांच्या जागृततेची व त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचिती आली आहे. यामुळे जीवन स्वामीमय झाले आहे. माझ्यासह अनेक भाविकांच्या जीवनात स्वामी भक्तीला अग्रस्थान असल्याने माझ्या सह तमाम स्वामी भक्तांच्या भक्तीतून स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय होत असल्याचे मनोगत सातारा संस्थानच्या छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या सुकन्या वृषालीराजे भोसले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी वृषालीराजे भोसले यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी वृषालीराजे बोलत होत्या. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीसह, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, सोलापूरचे इंद्रजीत पवार, ओम पवार यासह स्वामीभक्त उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240