अक्कलकोट तालुक्यातील(करजगी) जेऊर जि.प.गट ॲड.दयानंद उंबरजे यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार.
प्रतिनिधी-अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील ॲड.दयानंद उंबरजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.ॲड.दयानंद उंबरजे हे भाजपचे युवा क्रीयाशील नेते असून जेऊर जि.प गटात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.गावातील व तालुक्यातील प्रत्येक विधायक सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर असतात.त्यांनी पक्षाच्या माध्यमातून वंचित,पीडित गोरगरिबांना लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.करजगी ग्रामपंचायतीवर उंबरजे परिवाराचे वर्चस्व आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जलजीवन योजना, सांडपाण्याच्या गटारी, रस्त्यांची कामे यासाठी सरपंच येकू उंबरजे, ॲड.दयानंद उंबरजे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला आहे.ते पक्षाचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240