तानाजी सावंत व संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावे यासाठी श्रीदत्तचरणी साकडे.
प्रतिनिधी-सोलापूर
दत्त जयंतीनिमित्त शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल (बापू) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण,महिला आघाडी उपशहर प्रमुख अनिता ताई गवळी,सौ पूजा नवनाथ चव्हाण यांच्या तर्फे तानाजी सावंत साहेब यांना परत मंत्री पद मिळावे आणि तसेच बंजारा समाजाचे नेते संजय भाऊ राठोड यांना परत मंत्री पद मिळावे म्हणून CNS हॉस्पिटल समोरील दत्त मंदिरामध्ये पूजा करून उपस्थित भाविकाना प्रसाद वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अंजना चव्हाण,मानिशा पारवे, यशोदा कांबळे,पारूबाई चव्हाण आदी भाविक उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240