Posts

Showing posts from November, 2024

श्री विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित देवस्थानच्या ए.वन चौक येथील श्री उपलप विठ्ठल मंदिरात गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली. देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ६ या वेळेत भजन संपन्न होऊन नामस्मरण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती संपन्न झाली. त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी सत्संग महिला भजनी मंडळाचे उज्वलाताई सरदेशमुख, कौशल्या जाजू, सुरेखा तेली, निंगूताई हिंडोळे, शकुंतला कटारे, सुरेखा जाधव, प्रदीप हिंडोळे, संजय मोरे, स्वाती जाधव, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे, सुवर्णा जाधव, संजय मोरे, काशिनाथ इंडे, रवीराव महिंद्रकर, दीपक बागेवाडीकर, सोनी चव्हाण, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, साग...

भारतीय संविधान काल आणि आज;लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान जनजागृतीची गरज.

Image
प्रतिनिधी-सोलापूर मराठा समाज सेवा मंडळ, संचलित छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त IQAC, इतिहास व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेडॉ. वाल्मिक कीर्तीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी संविधाना बाबत  बोलताना ते म्हणाले संविधानातील मूलतत्त्वांचा आधार घेऊन भारतीय समाजाने वैयक्तिक प्रगती करत, राष्ट्र उन्नती मध्ये योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान दिन साजरा करीत असताना राष्ट्रीय मूल्य जपणूक होणे व संविधानातील विचार सामान्य जनतेपर्यंत विचाररुपी पोहोचले पाहिजेत याकरिता प्रत्येकाने संविधान जनजागृती करण्यासाठी विचार व्यक्त केले.   या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मधुकर पवार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले संविधान हे स्वांतत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित आहे. संविधानाने दिलेले हक्क अधिकार याबद्दल जागरूकता तर झालीच पाहिजे व प्रत्येकाने संविधान अंगीकारून संविधानातील मूलतत्त्वांचा आधार घेऊन भारतीय समाजाने वैयक्तिक प्रगती केली पाहिजे असे मत प्राचार्य डॉ पवार यांनी व्यक्त केले....

आण्णा दिक्षित यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; रयत शिक्षण संकुलामध्ये जल्लोष.

Image
प्रतिनिधी-सोलापूर रावजी सखाराम हायस्कूलचे सहशिक्षक आण्णा बाबु दिक्षित यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने बेळगाव येथे सन्मानित करण्यात आले. हे वृत्त समजतच रयत शिक्षण संकुल जल्लोष करण्यात आला. इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील निवडक शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार सोहळा  बेळगाव येथे संपन्न झाला.   प्रमाणपत्र, विशेष सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार व मा‌. केंद्रीय मंत्री  यांच्याकडून अभिनंदन पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते . आण्णा दिक्षित उत्तम गणित शिक्षक असून  लेखक, कवी व उत्तम वक्ते आहेत. शिक्षणशास्त्र विषयाच्या अनुषंगाने त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विविध शाळा व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे. ते उत्तम मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांना संगणकाचेही उत्तम ज्ञान आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून विद्यार्थ्...

राजकीय जीवन प्रवासात समर्थांचे व तालुक्यातील जनतेचे आशिर्वाद मोलाचे.

Image
आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट        मी व माझे संपूर्ण कुटूंब स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आपल्या आज पर्यंतच्या राजकीय व सामाजिक कार्यात स्वामी समर्थांचे आशिर्वाद व तालुक्यातील जनतेचे प्रेम व शुभेच्छा आपणांस मोलाचे आहेत. या माध्यमातून आपणास भूतकाळात व वर्तमान काळात लाभलेलं आमदार पद हे तालुक्यातील विकासकामांची साखळी कायम करण्यासाठी मतदारांनी दिलेली अमूल्य संधी आहे.  यामुळे आपण सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभारी आहोत असे सांगून स्वामी समर्थांचे आशीर्वाद व तालुक्यातील जनतेची आपल्यावरील निष्ठा या मुळेच आपणांस यंदाही विधानसभेच्या निवडणूकीत विजय संपादन होवून सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आपणास विधानसभेत पाठविले असल्याचे मनोगत अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे फेरनिर्वाचित आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या विजयानंतर प्रथम श्री स्...

सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे यांचे निधन.

Image
 सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे यांचे निधन. प्रतिनिधी-सोलापूर पाटबंधारे खात्यात व सोलापूर जिल्हा परिषदेत विविध अभियन्त्रिकी पदावर सेवा दिलेले व सध्या सर विश्वेश्वरय्या नगर, जुळे सोलापूर येथे वास्तव्यास असलेले, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे (वय ६५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांचेवर बोंडले, ता. माळशिरस येथील त्यांचे शेतात अंतिम संस्कार करण्यात आले.  यावेळी त्यांचे परिवारांसह नातेवाईक, पदाधिकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे . -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

सामाजिक धार्मिक सेवाकार्यातून महेश इंगळेंना स्वामी सेवेची सुवर्णसंधी लाभली आहे - आमदार रामचंद्र माने

Image
सामाजिक धार्मिक सेवाकार्यातून महेश इंगळेंना स्वामी सेवेची सुवर्णसंधी लाभली आहे - आमदार माने सामाजिक धार्मिक सेवाकार्यातून महेश इंगळेंना स्वामी सेवेची सुवर्णसंधी लाभली आहे - आमदार रामचंद्र माने प्रतिनिधी-अक्कलकोट  श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे सतत सामाजिक धार्मिक कार्याच्या माध्यमातून कार्यान्वित असतात. वटवृक्ष मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक धार्मिक कार्याची साखळी जोडलेली आहे. गाभारा नुतनीकरणासारख्या भक्तीयुक्त कामकाजामुळे वटवृक्ष मंदिर समितीने ऐतिहासिक कामगिरी करत वटवृक्ष मंदिराच्या नैसर्गिकतेत मोठे बदल घडूवून भरीव कामगिरी केलेली आहे, त्यामुळे सामाजिक धार्मिक कार्याच्या माध्यमातून महेश इंगळे यांना स्वामी सेवेची सुवर्णसंधीच लाभलेली आहे असे मनोगत मोहोळचे आमदार माने यांनी बाळराजे पाटील यांच्या उपस्थितीत व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार माने बाळराजे पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे...

निवडणुकीमुळे राज्यात तळेरामांचे वांदे ;एक-दोन नाही सलग चार दिवस ड्रायडे घोषित.

Image
निवडणुकीमुळे राज्यात तळेरामांचे वांदे ;एक-दोन नाही सलग चार दिवस ड्रायडे घोषित. प्रतिनिधी-सोलापूर महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मागील अनेक आठवड्यापासून सुरूअसलेलेआरोप-प्रत्यारोप, बैठका,रोड-शो, ₹जाहीर सभा या सर्वांना सोमवारी सायंकाळी सहा नंतर ब्रेक लागला. विशेष म्हणजे प्रचार संपण्याबरोबर मतदानाआधीच म्हणजेच १८ तारखेला प्रचाराची काळमर्यादा संपल्यापासून म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्य विक्री बंद केली गेली विधानसभा निवडणुकीच्या महिन्यांमध्ये राज्यात एकूण ४ दिवस ड्रायडे असणार आहे हे दिवस कोणते आणि काय निर्बंध ते पहा... मद्यविक्री बंदी कधी आणि कशी असेल... दि. १८ नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंदी केली जाईल  दि.१९ नोव्हेंबर मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून संपूर्ण दिवसभर मद्यविक्री बंदअसेल. दि.२० नोव्हेंबर निवडणुकीचा दिवस असल्याने मद्यविक्री दिवसभर बंद राहणार आहे दि.२४ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजता दिवस सुरू होतो तिथपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निवडणूक आयोग निकालाची घोषणा करत नाही तोपर्यंत बंद मद्यविक्री बंद असणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या होण...

२५१दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव कोगनुरे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.

Image
प्रतिनिधी-सोलापूर २५१ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव कोगनुरे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.

Image
वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. प्रतिनिधी-सोलापूर २५१, सोलापूर शहर दक्षिणचे  वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत लोकप्रिय उमेदवार संतोष पवार यांनी आपल्या धर्म पत्नी सौ.प्रिया संतोष पवार यांच्या सह आनंद नगर तांडा, मद्रे, बूथ क्रमांक ९६, येथे मतदानाचा हक्क बजावला. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मतदान;सोलापूर वासीयांना केले मतदान करण्याचे आवाहन.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर चे जिल्हाधिकारी मा.कुमार आशीर्वाद यांनी आज सकाळी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ अंतर्गत सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

तालुक्याच्या प्रगतीसाठी परिवर्तनाची गरज - संतोष पवार.

Image
  प्रतिनिधी-सोलापूर  251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या गावभेट आणि प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. चिंचपूर, टाकळी, औराद, नालंदा नगर, कुरघोट, औज, कारकल, लवंगी, भंडारकवठे, मंद्रूप या ग्रामीण भागांसह हत्तुरे वस्ती आणि नई जिंदगी या शहरी भागांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधत परिवर्तनाचा नवा हुंकार भरला.   "निधीची गप्पा आणि समस्यांचे दुर्लक्ष" पवार यांनी आपल्या प्रचार सभेत प्रस्थापित नेत्यांवर टीका करताना म्हटले, "सध्याचे आमदार आणि नगरसेवक फक्त निधी आणल्याच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारींना पूर्णतः दुय्यम मानले जाते. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे."   " मूलभूत सुविधांचा अभाव आणि दयनीय स्थिती"  पवार यांनी तालुक्यातील दयनीय परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, "गावागावांमध्ये ड्रेनेज लाईनचा अभाव, पाच दिवसांनी गढूळ पाणीपुरवठा, अपूर्ण दिवाबत्तीची व्यवस्था आणि खड्डेमय रस्ते ही गंभीर ...

स्वामीकृपेचा ध्यास घेवून अक्कलकोटी आलोय - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

Image
मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करताना प्रथमेश इंगळे, सचिन दादा कल्याण शेट्टी व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि हरि दर्शनाची अनुभूती प्राप्त होते असे साक्षात्कारिक स्थान म्हणजे अक्कलकोट निवासी श्री  स्वामी समर्थांचे पावन स्थान तथा येथील वटवृक्ष मंदिर होय. केवळ भाग्यवंतांनाच स्वामी दर्शनाचा लाभ मिळतो याची प्रचिती स्वामी दर्शनाचा लाभ मिळालेल्या भाग्यवान स्वामी भक्तांना येते याची आपणाला माहिती मिळाली आहे. या अनुशंगाने स्वामीकृपेचा ध्यास घेवून अक्कलकोटी आलो असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी भाविकांच्या स्वामी दर्शन अनुभूती बद्दल बोलताना  मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  यावेळी आमदार सचिन द...

भिमनगरला सर्वाधिक निधी देणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे : कमलाकर सोनकांबळे

Image
  अक्कलकोट- प्रतिनीधी  भीमनगर गोगांव येथील समाज बांधवांचे  बैठक  घेण्यात आले असून त्यात समस्त भीम नगर आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या पाठीशी राहून एकजुठीने मतदान करण्याचे ठरले. या मीटिंगचे अध्यक्षस्थानी नामदेव सोनकांबळे, कल्लपा बनसोडे, यशवंत गायकवाड, चीतानंद सोनकांबळे, हे होते उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ,  भाजपा तालुका उपाध्यक्ष  प्रदीप जगताप , शाम बाबर, महेश आलूरे , प्रदीप जगताप यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गायकवाड म्हणाले की आपल्या समाजाच्या विकासासाठी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिले असून त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीर उभे राहून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.  यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की, पाणीदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यात प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय वस्तीला निधी मंजूर करून दिले साडे सतरा वर्ष आमदार, मंत्री पद भोगलेले काँगेस उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे हे त्याच्या कार्य काळात आमच्या गोगांव मधील मागासवर्गीय वस्तीमध्ये  निधी...

प्रस्थापितांनी जनतेच्या विश्वासाचा सातत्याने अपमान केला - संतोष पवार.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  "प्रस्थापितांनी निवडून आल्यानंतर जनतेच्या मतांचा आणि विश्वासाचा अपमानच केला आहे. त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. निवडणुकीपुरताच लोकांशी जवळीक दाखवणाऱ्या या नेत्यांनी सत्तेत येताच जनतेकडे पाठ फिरवली. याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे," असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार संतोष सेवू पवार यांनी व्यक्त केले.   ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आयोजित प्रचार दौऱ्यात त्यांनी कुडल, बोळकवठा, चिंचपूर, टाकळी यांसारख्या गावांना भेट दिली. तसेच औराद येथे भरलेल्या जनसन्मान सभेत प्रस्थापितांवर त्यांनी जोरदार टीका केली.   "निवडणुकीपुरताच जनतेचा उपयोग"   "सोलापूर दक्षिण मतदारसंघावर नेहमीच प्रस्थापितांचे वर्चस्व राहिले आहे. निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी स्वप्ने दाखवून ते फसवतात. मात्र, निवडून आल्यानंतर विकासकामांच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा केला जातो. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल, असे वागण्यात प्रस्थापित नेत्यांना कधीच काही गैर वाटले नाही. त्यांच्या या कामचलाऊ वृत्तीमुळे मतदारसंघातील प्रश्न द...

महादेव कोगनुरे यांचा मॉर्निंग वॉक करून मतदारांशी संवाद. दक्षिण सोलापुरातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरात.

Image
u प्रतिनिधी-सोलापूर दक्षिण सोलापुरातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरात सुरू असून रविवारी पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी प्रल्हाद नगरातील फिटनेस क्लबसह अन्य मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले.दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पहिल्या दिवसांपासूनच झालेल्या सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठकांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावभेटी व शहरातील घरभेटी आणि सोसायट्यांमध्येही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आतषबाजी करून पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. शनिवारी त्यांनी शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, बांधकाम क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिकांशी त्यांनी संवाद साधला.  सर्व स्तरातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.  र विवारी शहरातील विविध मैदानांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांनी मतदानाचे आवाहन केले. व्यायाम करणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले. अनेक ज्येष्ठ नागरिकही चार ते पाच किलो...

मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास महादेव कोगनुरे; दक्षिण सोलापुरात विजापूर रोड मनसेच्या पदयात्रेला गर्दी.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  मी कोरोना काळात केलेले कार्य जनता विसरली नाही. तुमच्यामुळे आमचा जीव वाचला असे मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते. आता मतदार संघाचा विकास करणे हाच ध्यास घेऊन मी निवडणुकीत आहे. जनता माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले. सोलापूर दक्षिण मतदार संघात विजापूर रोड शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता परिवर्तन हवे आहे, प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळी साडेआठ वाजता रेवणसिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरम नगर अशोक नगर नेहरूनगर कमला नगर सुशील नगर माशाळ वस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा झाली.  पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी नागरिक पदयात्रेचे जोरदार...

नई जिंदगी आणि घोडा तांडा येथे संतोष पवार यांना बंजारा आणि मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा: सोलापूर दक्षिणमध्ये परिवर्तनाचे वारे.

Image
नई जिंदगी आणि घोडा तांडा येथे संतोष पवार यांना बंजारा आणि मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा: सोलापूर दक्षिणमध्ये परिवर्तनाचे वारे. नई जिंदगी, घोडा तांडा (251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ)वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नई जिंदगी आणि घोडा तांडा येथे आयोजित जनसन्मान सभेला बंजारा आणि मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पवार यांनी या सभेत तालुक्याच्या विकासाच्या अपुऱ्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कठोर टीका केली.    "सत्ता, पदं, पण विकासाचा अभाव"  "सोलापूर जिल्ह्याने एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर नेते दिले, मोठमोठी मातब्बर मंडळी तालुक्यातून निवडून गेली. बारामतीने जितकी पदं भूषवली, तितकीच सोलापूरनेही मिळवली, मात्र याचा फायदा तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला कधीच झाला नाही. विकासाच्या संधी बाजूला सारून फक्त घराणेशाही आणि राजकीय स्वार्थाची पोषणं झाली," असे संतोष पवार यांनी सांगितले.    MIDC रद्द आणि सिंचन क्षेत्राचे प्र...

स्वामीभक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली - गायक अतुल गोगावले.

Image
 स्वामीभक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली - गायक अतुल गोगावले. प्रतिनिधी अक्कलकोट,  जीवनातील स्वामींच्या प्रचितीनुसार स्वामी समर्थांची अगाध लिला पाहून मीही धन्य झालो. कळत नकळत जीवन स्वामी भक्तीत गुंतत गेले. या स्वामी भक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली असे मनोगत सुप्रसिध्द अजय-अतुल जोडगोळीतील गायक अतुल गोगावले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी  गायक अतुल गोगावले व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी अतुल गोगावले बोलत होते. पुढे बोलताना अतुल यांनी लवकरच वटवृक्ष मंदीरात स्वामीचरणी गायन सेवा अर्पण होण्यासाठी स्वामीचरणी साकडे घालून नतमस्तक झालो असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संतोष जमगे इत्यादी...

दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांचा गुप्त बैठकीवर जोर; भाजप व काँग्रेसचे नाराज गट महादेव कोगनुरे यांच्या संपर्कात मनसैनिकात मात्र उत्साह.

Image
प्रतिनिधी-सोलापूर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा आजचा दिवस विशेष करुन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस व भाजप च्या नाराज गटा बरोबर गुप्त बैठका सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप व काँग्रेसचे नाराज गटांना एकत्रित करुन महादेव कोगनुरे हे कोणती नवीन राजकीय रणनीती आकतात हे पहाणे औत्सुक्य ठरणार आहे. आता हे नाराज गट जर एकत्रित येऊन महादेव कोगनुरे यांना बळ दिल्यास नक्कीच दक्षिण चे चित्र पालटणार असल्याचे बोलले जात आहे.सर्व सामान्य माणूस हा महादेव कोगनुरे यांच्या केंद्रस्थानी असल्याने सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच महादेव कोगनुरे हे झटत असतात. यामुळेच मतदारसंघात महादेव कोगनुरे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद पहायला मिळत आहे.त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील काँग्रेस व भाजपचे नाराज गट महादेव कोगनुरे यांच्या संपर्कात आल्यास दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांचा  ताकद वाढण्यास मदत होणार आहे.इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र नवचैतन्य पसरल्याचे चित्...

हत्तुर येथील ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरात नारळ वाढवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  २५१,सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हत्तुर येथील ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी प्रचार सभेत संतोष पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,तालुक्यातील धनाढ्य आणि प्रस्थापित नेत्यांनी स्वार्थासाठी केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे आणि परस्पर पूरक भूमिका घेऊन तालुक्याला प्रश्न न सोडवता तालुक्याला आता या स्वार्थी राजकारणाला आळा घालण्याची आणि तालुक्याच्या खऱ्या हितासाठी काम करण्याची वेळ आल्याचे ठामपणे सांगण्यात आले.  तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून जनता सजग होऊन, प्रस्थापित नेते आणि घराणेशाही विरोधात ठाम भूमिका घेत परिवर्तन घडवून आणेल,जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने मी आमदार होऊन सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी,कामगार ,बेरोजगार यांचे प्रश्न सोडवणार तसेच मतदारसंघाचा जो विकास रखडला आहे. तो विकास पूर्णत्वास घेऊन जाणार भेडसवणारा पाणी प्रश्न सोडवणार असून बेरोजगारांच्या हाताला एम आय डी सीच्या माध्यमा...