भारतीय संविधान काल आणि आज;लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान जनजागृतीची गरज.



प्रतिनिधी-सोलापूर
मराठा समाज सेवा मंडळ, संचलित छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त IQAC, इतिहास व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेडॉ. वाल्मिक कीर्तीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी संविधाना बाबत  बोलताना ते म्हणाले संविधानातील मूलतत्त्वांचा आधार घेऊन भारतीय समाजाने वैयक्तिक प्रगती करत, राष्ट्र उन्नती मध्ये योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान दिन साजरा करीत असताना राष्ट्रीय मूल्य जपणूक होणे व संविधानातील विचार सामान्य जनतेपर्यंत विचाररुपी पोहोचले पाहिजेत याकरिता प्रत्येकाने संविधान जनजागृती करण्यासाठी विचार व्यक्त केले.
 
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मधुकर पवार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले संविधान हे स्वांतत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित आहे. संविधानाने दिलेले हक्क अधिकार याबद्दल जागरूकता तर झालीच पाहिजे व प्रत्येकाने संविधान अंगीकारून संविधानातील मूलतत्त्वांचा आधार घेऊन भारतीय समाजाने वैयक्तिक प्रगती केली पाहिजे असे मत प्राचार्य डॉ पवार यांनी व्यक्त केले. 
डॉ. युवराज सुरवसे यांनी संविधानाच्या सरनामाचे वाचन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज सुरवसे , सूत्रसंचालन डॉ. राणी मोटे तर शेवटी  डॉ युवराज सुरवसे आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. अरुण मित्रगोत्री डॉ. अरुण सोनकांबळे डॉ. राणी मोटे,  डॉ. नागेश गायकवाड, डॉ. अभिमन्यू ओहोळ प्रा. संघमित्रा चौधरी, प्रा रामनाथ मोरे, भानुदास घंदुरे, शहाजी जाधव, महेश डेंगळे, ओंकार काकडे, केशव लोंढे, संजू थिटे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर