भिमनगरला सर्वाधिक निधी देणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे : कमलाकर सोनकांबळे

 


अक्कलकोट- प्रतिनीधी 
भीमनगर गोगांव येथील समाज बांधवांचे  बैठक  घेण्यात आले असून त्यात समस्त भीम नगर आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या पाठीशी राहून एकजुठीने मतदान करण्याचे ठरले.या मीटिंगचे अध्यक्षस्थानी नामदेव सोनकांबळे, कल्लपा बनसोडे, यशवंत गायकवाड, चीतानंद सोनकांबळे, हे होते उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ,  भाजपा तालुका उपाध्यक्ष  प्रदीप जगताप , शाम बाबर, महेश आलूरे , प्रदीप जगताप यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना नितीन गायकवाड म्हणाले की आपल्या समाजाच्या विकासासाठी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिले असून त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीर उभे राहून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. 


यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की, पाणीदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यात प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय वस्तीला निधी मंजूर करून दिले
साडे सतरा वर्ष आमदार, मंत्री पद भोगलेले काँगेस उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे हे त्याच्या कार्य काळात आमच्या गोगांव मधील मागासवर्गीय वस्तीमध्ये  निधी दिले नाहीत त्या उलट  आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या केवळ पाच वर्षाच्या कार्यकाळात कोरोना काळ वगळता फक्त दोन वर्षात आमच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये विकासासाठी 69 लाख निधी दिले असून त्याचे काम प्रगती पथावर आहेत मला अभिमान आहे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टीचे ज्या ज्या वेळी आम्ही निधी मागणी केले त्या प्रत्येक वेळी आम्हला भरीव निधी दिले आहे अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक गोगांव मध्ये होत असून त्याचे काम चालू आहे भविष्यात ही त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले आहेत समाजाच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या लोक प्रतिनीधीना  निवडून देणे गरजेचे आहे, ज्यांनी आपल्या समाजाला सतरा वर्ष फक्त मतासाठी वापरू करून घेतले परंतु वस्तीच्या विकासासाठी कधी निधी दिले नाहीत आपण सर्व जाणकार मतदार असून आपण स्वतः विचार करून आपल्या मनाला सचिन दादा नी काम केले असेल असं वाटलं  तरच आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांना मतदान करा
मतांच्या राजकारण साठी समाजामध्ये भांडण पेटवून राजकीय पोळी भाजून घेणारे अनेक पुढारी आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही समाजाच्या हितासाठी, विकासासाठी काम करायचं आपल्या वस्तीत बुद्ध विहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक , सम्यक अभ्यासिका केंद्र चालू करण्याचे आपले प्रयत्न असून या माध्यमातून समाजातील भावी पिढी शिकून प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, नोकरदार वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आपले समाज शिकलं पाहिजे व त्याचे आर्थिक प्रगती झाले पाहिजे यासाठी आमचे मिशन चालू आहे
 समाजाच्या विकासासाठी पुन्हा एकदा आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांना आमदार करण्यासाठी आपले अनमोल मत देऊन सहकार्य करावे.
'आपले मत म्हणजे विकासाला मत'
'आपले मत म्हणजे प्रगतीला मत'
आपले मत म्हणजे समाजाच्या विकासाला मत आहे गेल्या दोन वर्षांत केलेले कामे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर गोगांव  खडीकरण जि.प.समाजकल्याण,सोलापूर 3 लाख , सिमेंट काँक्रिट  जि.प.समाजकल्याण,सोलापूर  3 लाख, स्मशन भूमी शेड जन सुविधा  3 लाख,  डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य सरकार सामाजिक न्याय 10 लाख, डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह  राज्य सरकार सामाजिक न्याय 10 लाख, समाज मंदिर समोर  पेव्हर ब्लॉक राज्य सरकार सामाजिक न्याय 10 लाख,  सिमेंट काँक्रिट राज्य सरकार सामाजिक न्याय 10 लाख, सिमेंट काँक्रिट जी प समाजकल्याण सोलापूर 7 लाख, बंदिस्त गटार   जी प समाजकल्याण सोलापूर 6 लाख, सिमेंट रस्ता जी प समाजकल्याण सोलापूर 7 लाख असे  एकूण 69 लाख पडसावळ रोड ते गायकवाड शेत पर्यंत मातोश्री पाणंद रस्ता मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
महादेव सोनकवडे, विठल वाघमारे यांनी ही मार्गदर्शन केले
यावेळी समाज बाधव परमेश्वर गायकवाड, सुरेश सोनकांबळे, विनोद बनसोडे, आकाश गायकवाड, किरण गायकवाड, कलप्पा गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, शांतकुमार गायकवाड, संजय गायकवाड, यासह युवक पुरुष महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर