सामाजिक धार्मिक सेवाकार्यातून महेश इंगळेंना स्वामी सेवेची सुवर्णसंधी लाभली आहे - आमदार रामचंद्र माने
सामाजिक धार्मिक सेवाकार्यातून महेश इंगळेंना स्वामी सेवेची सुवर्णसंधी लाभली आहे - आमदार माने
![]() |
सामाजिक धार्मिक सेवाकार्यातून महेश इंगळेंना स्वामी सेवेची सुवर्णसंधी लाभली आहे - आमदार रामचंद्र माने |
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे सतत सामाजिक धार्मिक कार्याच्या माध्यमातून कार्यान्वित असतात. वटवृक्ष मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक धार्मिक कार्याची साखळी जोडलेली आहे. गाभारा नुतनीकरणासारख्या भक्तीयुक्त कामकाजामुळे वटवृक्ष मंदिर समितीने ऐतिहासिक कामगिरी करत वटवृक्ष मंदिराच्या नैसर्गिकतेत मोठे बदल घडूवून भरीव कामगिरी केलेली आहे, त्यामुळे सामाजिक धार्मिक कार्याच्या माध्यमातून महेश इंगळे यांना स्वामी सेवेची सुवर्णसंधीच लाभलेली आहे असे मनोगत मोहोळचे आमदार माने यांनी बाळराजे पाटील यांच्या उपस्थितीत व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार माने बाळराजे पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी बोलताना आमदार माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, गिरीश पवार, संजय पवार, सागर दळवे इत्यादी उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240