स्वामीभक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली - गायक अतुल गोगावले.

 स्वामीभक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली - गायक अतुल गोगावले.
प्रतिनिधी अक्कलकोट, 
जीवनातील स्वामींच्या प्रचितीनुसार स्वामी समर्थांची अगाध लिला पाहून मीही धन्य झालो. कळत नकळत जीवन स्वामी भक्तीत गुंतत गेले. या स्वामी भक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली असे मनोगत सुप्रसिध्द अजय-अतुल जोडगोळीतील गायक अतुल गोगावले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी 
गायक अतुल गोगावले व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी अतुल गोगावले बोलत होते. पुढे बोलताना अतुल यांनी लवकरच वटवृक्ष मंदीरात स्वामीचरणी गायन सेवा अर्पण होण्यासाठी स्वामीचरणी साकडे घालून नतमस्तक झालो असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संतोष जमगे इत्यादी उपस्थित होते.
अतुल गोगावले कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर