निवडणुकीमुळे राज्यात तळेरामांचे वांदे ;एक-दोन नाही सलग चार दिवस ड्रायडे घोषित.
निवडणुकीमुळे राज्यात तळेरामांचे वांदे ;एक-दोन नाही सलग चार दिवस ड्रायडे घोषित.
प्रतिनिधी-सोलापूर
महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मागील अनेक आठवड्यापासून सुरूअसलेलेआरोप-प्रत्यारोप,
बैठका,रोड-शो, ₹जाहीर सभा या सर्वांना सोमवारी सायंकाळी सहा नंतर ब्रेक लागला. विशेष म्हणजे प्रचार संपण्याबरोबर मतदानाआधीच म्हणजेच १८ तारखेला प्रचाराची काळमर्यादा संपल्यापासून म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्य विक्री बंद केली गेली विधानसभा निवडणुकीच्या महिन्यांमध्ये राज्यात एकूण ४ दिवस ड्रायडे असणार आहे हे दिवस कोणते आणि काय निर्बंध ते पहा...
मद्यविक्री बंदी कधी आणि कशी असेल...
दि. १८ नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंदी केली जाईल
दि.१९ नोव्हेंबर मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून संपूर्ण दिवसभर मद्यविक्री बंदअसेल. दि.२० नोव्हेंबर निवडणुकीचा दिवस असल्याने मद्यविक्री दिवसभर
बंद राहणार आहे
दि.२४ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजता दिवस सुरू होतो तिथपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निवडणूक आयोग निकालाची घोषणा करत नाही तोपर्यंत बंद मद्यविक्री बंद असणार आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या होणार कारवाई....
निमांच उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहेत एखाद्या व्यक्तीकडे या कालावधीमध्ये विनापरवाना मद्यसाठा आढळून आल्यास त्याच्याविरोधातही कठोर कारवाई केली जाणार आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240