श्री विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित देवस्थानच्या ए.वन चौक येथील श्री उपलप विठ्ठल मंदिरात गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली. देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ६ या वेळेत भजन संपन्न होऊन नामस्मरण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती संपन्न झाली. त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी सत्संग महिला भजनी मंडळाचे उज्वलाताई सरदेशमुख, कौशल्या जाजू, सुरेखा तेली, निंगूताई हिंडोळे, शकुंतला कटारे, सुरेखा जाधव, प्रदीप हिंडोळे, संजय मोरे, स्वाती जाधव, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे, सुवर्णा जाधव, संजय मोरे, काशिनाथ इंडे, रवीराव महिंद्रकर, दीपक बागेवाडीकर, सोनी चव्हाण, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, सागर गोंडाळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240