महादेव कोगनुरे यांचा मॉर्निंग वॉक करून मतदारांशी संवाद. दक्षिण सोलापुरातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरात.



प्रतिनिधी-सोलापूर
दक्षिण सोलापुरातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरात सुरू असून रविवारी पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी प्रल्हाद नगरातील फिटनेस क्लबसह अन्य मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले.दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पहिल्या दिवसांपासूनच झालेल्या सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठकांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावभेटी व शहरातील घरभेटी आणि सोसायट्यांमध्येही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आतषबाजी करून पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. शनिवारी त्यांनी शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, बांधकाम क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिकांशी त्यांनी संवाद साधला.  सर्व स्तरातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. 





विवारी शहरातील विविध मैदानांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांनी मतदानाचे आवाहन केले. व्यायाम करणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले. अनेक ज्येष्ठ नागरिकही चार ते पाच किलोमीटर दररोज वॉक करत असतात. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी युवकांना केले. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांमध्येही प्रस्थापितांबाबत नाराजी असून त्यांनी यंदा आमचे मत तुम्हालाच असा शब्द महादेव कोगनुरे यांना दिला.
महादेव कोगनुरे फिट उमेदवार
मॉर्निंग वॉक करताना स्वतः महादेव कोगनुरे हे शारीरिकदृष्ट्या फिट असल्याने असाच आमदार हवा अशी प्रतिक्रिया युवकांंनी दिली. आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त वॉकिंग ट्रॅक आणि खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा देण्याचे आश्वासन महादेव कोगनुरे यांनी दिले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर